-    मध्यप्रदेशच्या हरदामध्ये मंगळवारी रात्री दोन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना भीषण अपघात झाला. 
-    कामायनी एक्स्प्रेस मुंबईहून वाराणसीकडे निघाली होती. जोरदार पाऊस असल्याने माचक नदीवरचा पूल व त्यावरील रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. 
-    हे रूळ ओलांडतानाच कामायनी एक्स्प्रेसचे सहा ते सात डबे रुळावरून घसरले. 
-    त्यानंतर काही वेळाने जबलपूरहून मुंबईकडे येणाऱ्या जनता एक्स्प्रेसचे इंजिन आणि तीन डबेही त्याच ठिकाणी रुळावरून घसरले. 
-    अपघातानंतर दोन्ही गाड्यांचे काही डबे पाण्याखाली गेले असून त्यात अनेक प्रवासी अडकले आहेत. 
-    अत्यंत भीषण अशा या अपघातात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली असून ३०० हून अधिक जणांना वाचविण्यात यश आल्याचे समजते. घटनास्थळी रेल्वेच्या बचाव पथकाकडून मदत व बचावकार्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 
-    कामायनी एक्स्प्रेस मुंबईहून वाराणसीकडे निघाली होती. जोरदार पाऊस असल्याने माचक नदीवरचा पूल व त्यावरील रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. हे रूळ ओलांडतानाच कामायनी एक्स्प्रेसचे सहा ते सात डबे रुळावरून घसरले. 
-    जबलपूरहून मुंबईकडे येणाऱ्या जनता एक्स्प्रेसचे इंजिन आणि तीन डबेही त्याच ठिकाणी रुळावरून घसरले. 
-    मृत्युमुखींच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत रेल्वे मंत्रालयाने जाहीर केली आहे, तर गंभीर जखमींना ५० हजार आणि किरकोळ जखमींना २५ हजार रुपये दिले जाणार आहेत. 
-    या अपघातामुळे मुंबई-इटारसी रेल्वे मार्गावरील गाड्यांवर परिणाम झाला असून चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर इतर गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. 
 
  INDW vs AUSW: भारत वर्ल्डकप जिंकला तर मी जेमिमा रॉड्रिग्जबरोबर.., सुनील गावसकरांनी दिलं वचन 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  