-
अॅशेस विजयासाठी ‘जिवाचे रान करा’ हा कर्णधार अॅलिस्टर कुकचा संदेश प्रमाण मानत ब्रॉडने ९.३ षटकांत केवळ १५ धावांच्या मोबदल्यात ८ बळी मिळवण्याची अद्भुत कामगिरी केली.
-
‘जशास तसे’ हा नॉटिंगहॅमशायरच्या रॉबिन हूडचा वारसा पुढे चालवणाऱ्या ब्रॉडच्या अविश्वसनीय प्रदर्शनाच्या बळावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पहिला डावात अवघ्या ६० धावांत खुर्दा उडवला.
-
कुकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात ब्रॉडने चिवट ख्रिस रॉजर्सला कुककडे झेल देण्यास भाग पाडले आणि कारकीर्दीतील ३००व्या विकेटची नोंद केली.
-
मिचेल स्टार्क आणि मिचेल जॉन्सनला बाद करत ब्रॉडने ऑस्ट्रेलियाच्या सन्मान वाचवण्याच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आणल्या.
-
ब्रॉडने आपल्या भेदक गोलंदाजीने कांगारुंना नामोहरम करुन सोडले.
-
ब्रॉडच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया गारद.
-
जेम्स अँडरसनच्या अनुपस्थितीत गोलंदाजी ताफ्याचे नेतृत्व सक्षमपणे करणाऱ्या ब्रॉडच्या विक्रमी ३००व्या विकेटसह इंग्लंडने अॅशेस विजयाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले.
-
अॅशेसच्या चौथ्या कसोटीचा पहिला दिवस इंग्लंडसाठी ‘ब्रॉड’ दिवस ठरला.
-
धावांसाठी झगडणाऱ्या मायकेल क्लार्कला बाद करत ब्रॉडने ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले.
-
विकेट मिळाल्यानंतर जल्लोष साजरा करताना स्टुअर्ट ब्रॉड.
-
ब्रॉडच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडच्या चौथ्या कसोटीत दमदार सुरूवात करता आली आहे.
-
ब्रॉडचा जल्लोष.
-
ब्रॉडच्या अद्भुत कामगिरीला उपस्थितांनी उदंड प्रतिसाद दिला.
-
ऑस्ट्रेलिया ‘ब्रॉड’ संकटात.
-
जोश हेझलवूड आणि नॅथन लियॉन जोडीने थोडा प्रतिकार केल्याने ऑस्ट्रेलियाने पन्नाशी पार केली. विश्रांतीनंतर परतणाऱ्या ब्रॉडने लियॉनला बाद केले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव ६० धावांतच आटोपला.
भगवान धन्वंतरीची ‘या’ दोन राशींवर असते आजन्म कृपा, आरोग्य संपदेसह कमावतात भरपूर धन अन् बक्कळ पैसा