-
अहमदाबादच्या बोपल भागात रिअल पोसिडॉन- अंडर वॉटर रेस्टॉरंट उभारण्यात आले आहे. जमिनीपासून २० फूट खाली सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या जागेत बसून खवय्यांना जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. (छाया- जावेद राजा)
-
या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता आणि जेवणासोबत विविध जातींचे, रंगीबेरंगी मासे पाहण्याची संधीही तुम्हाला मिळणार आहे. (छाया- जावेद राजा)
-
हे रेस्टॉरंट अहमदाबादमध्ये स्थायिक असलेले उद्योगपती भरत भट यांच्या मालकीचे आहे. (छाया- जावेद राजा)
-
तब्बल ३ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या रेस्टॉरंटमध्ये एका वेळेस ३२ जण बसू शकतात. (छाया- जावेद राजा)
-
या रेस्टॉरंटच्या सभोवताली तब्बल एक लाख ६० हजार लीटर पाणी आहे. ३००० स्केअर फुट परिसरात पसरलेल्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पाद्वारे हे पाणी शुद्ध करण्यात येते. (छाया- जावेद राजा)
-
या रेस्टॉरंटमध्ये अहमदाबाद, राजकोट आणि वडोदरा या परिसरातून आणलेल्या माशांसह तब्बल ४००० प्रजातीचे मासे ठेवण्यात आले आहेत.. रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला पंजाबी, थाई, चाईनीज, मेक्सिकन पद्धतीचे शाकाहारी पदार्थ खायला मिळतील. या रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी तुम्ही ऑनलाईन बुकिंगही करु शकता. (छाया- जावेद राजा)
-
सध्या अनुभवात्मक पर्यटनाच्या काळात जगभरात अंडरवॉटर डाईनिंगची संकल्पना दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसत आहे. समुद्री सृष्टीच्या सानिध्यात खानपानाचा आनंद लुटण्याकडे पर्यटकांचा कल वाढत आहे. जगातील अशाच प्रसिद्ध डाईनिंग रेस्टॉरंटची खास झलक.
अल महारा, दुबई. अॅक्वेरिअम रेस्टॉरंट, नॅशव्हिले, अमेरिका अट्रिअम बार, जर्मनी -
इतहा अंडर सी रेस्टॉरंट, मालदीव
-
ज्युलेस अंडर सी लाँज, फ्लोरिडा
-
पोझेईडॉन रेस्टॉरंट- फिजी
-
सी रेस्टॉरंट- मालदीव
रेड सी स्टार- इस्त्रायल उत्तर इन- स्वीडन

Pakistan Flood : निसर्गाला हलक्यात घेऊ नका! एकाच कुटुंबातील ९ जण डोळ्यादेखत गेले वाहून, मन हेलावून टाकणारा Video आला समोर