-
भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यात आज 'तेजस' हे हलक्या वजनाचे लढाऊ (लाईट कॉम्बॅट) विमान सामील झाले आहे. जाणून घेऊयात या बहुप्रतिक्षीत अद्ययावत लढाऊ विमानाबद्दलच्या महत्त्वपूर्ण गोष्टी.. (एक्स्प्रेस फोटो)
-
यंदाच्या वर्षात एकूण सहा 'तेजस' लढाऊ विमानं भारतीय हवाई दलात दाखल होणार आहेत, तर पुढील वर्षी आणखी आठ 'तेजस' लढाऊ विमानं दाखल होण्याची शक्यता आहे. वैमानिकाच्या संपूर्ण सुरक्षेचा विचार करून तेजस हे लढाऊ विमान डिझाईन करण्यात आले आङे. (एक्स्प्रेस फोटो)
-
आतापर्यंत अनेकदा डेडलाईन चुकवलेले 'तेजस' हे लढाऊ विमान तुलनेने हलके, चपळ आणि योजनाबद्ध हालचाली करणारे लढाऊविमान आहे. हवाई दलाच्या ताफ्यात सध्याच्या 'मिग-२१' ऐवजी आता 'तेजस'चा समावेश होणार आहे. (एक्स्प्रेस फोटो)
-
डीआरडीओ आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱया या प्रकल्पाची किंमत तब्बल ३० हजार कोटींच्या आसपास आहे.
-
'तेजस' या लढाऊ विमानाचे वजन १२ टन इतके असून, लांबी १३.२ मीटर, उंची ४.४ मी आणि पंखांची लांबी ८.२ मी. इतकी आहे. विमानाचा वेग प्रतितास १,३५० किमी. इतका आहे.
-
नौदलाच्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात 'तेजस'च्या 'नौदल व्हर्जन'चे उड्डाण होणार आहे. (एक्स्प्रेस फोटो)

'तेजस' या लढाऊ विमानाचा उपयोग नौदल आणि हवाई दलाला होणार आहे. २०१७-१८ पर्यंत सर्व २० विमानांची तुकडी हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. (एक्स्प्रेस फोटो)
दोन दोन दिवस पोट साफ होत नाही? रात्री फक्त ‘या’ पानांचं सेवन करा; सकाळी आतड्यांतील सगळी घाण होईल साफ