-
केरळमध्ये मुसळधार पावसाचा जोर आता कमी झाल्यामुळे सरकारने रेड अलर्टची सूचना मागे घेतली आहे. नागरिकांचे पुनर्वसन सुरू झाले आहे.
-
दोन दिवसांत पावसाने थोडा दिलासा दिला असून अर्नाकुलम, त्रिचूर, पथानथिट्टा, अलापुझा व कोल्लम जिल्ह्यात पुराने फार वाईट स्थिती झाली आहे. पाठ्यपुस्तक आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं वाळवताना त्रिचूरमधील हे चित्र..
-
८ ऑगस्टपासून केरळमध्ये पुराचे थैमान सुरू असून वीस हजार कोटींचे नुकसान झाले आहे. जनजीवन हळूहळू पूर्ववत होण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-
१०.७८ लाख लोक विस्थापित झाले असून त्यात २.१२ लाख महिला व १ लाख मुले आहेत. एकूण ३२०० मदत छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.
-
पुराचे पाणी ओसरू लागल्याने मदत छावण्यांमधून नागरिक घरी परतण्याची तयारी करू लागले आहेत.
-
पुराचं पाणी ओसरल्यानंतर घराची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी कुटुंबातील इतर व्यक्ती गेले असता मदत छावण्यांमध्ये थांबलेले वृद्ध..
वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना बक्षीस जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा