-
प्राण्यांचे विश्व अद्भूत आहे. प्राणी कधी कसे आणि का वागतील याचा काही नेम नाही. मात्र याच प्राण्याचे काही खास हावभाव टीपण्याची एक स्पर्धा नुकतीच संपुष्टात आली. या स्पर्धेचे नाव होते 'कॉमेडी वाइल्डलाइफ फोटोग्राफी अवॉर्ड्स' म्हणजेच जंगली प्राण्यांचे मजेदार फोटो क्लिक करणाऱ्या छायाचित्रकारांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये ६८ देशांमधून चार हजारहून अधिक फोटो पाठवण्यात आले होते. त्यापैकी निवडक फोटोंना पुरस्कार देण्यात आला आहे. चला तर पाहुयात याच अशा निवडक फोटोंची ही फोटोगॅलरी
-
बोस्टवानामधील सहार स्क्रीनर या छायाचित्रकाराच्या फोटोला पहिले पारितोषिक प्रदान करण्यात आले. या फोटोला 'ग्रॅब लाइफ बाय द…' अशी कॅप्शन देण्यात आली होती.
-
काय सगळं मजेत ना? (फोटो: थॉमस मॅग्लसेन)
-
बर्फामधील हसणाऱ्या घुबडाचा फोटोही सुंदर आला आहे. हा फोटो क्लिक केला आहे विकी जॅओरॉन यांनी
-
शार्क पाठलाग करताना या गोंधळलेल्या माशाचा फोटो अगदीच मजेशीर आहे. हा फोटो काढला आहे अँथनी पॅट्रोवीच यांनी
-
तिलकराज नागराज यांनी क्लिक केलेला फोटोही अव्वल १५ फोटोंमध्ये निवडण्यात आला. या फोटोमध्ये एक गेंडा लघवी करत असून एका पक्षाची त्यामध्ये अंघोळ झाल्याचे दिसत आहे.
-
हॅलोओओओओओ… (फोटो: डोना बरडॉन)
-
लाटांवर स्वार झालेल्या या पेंग्वीनला आपल्या कॅमेरामध्ये टीपले आहे फोटोग्राफर इल्मार वीस यांनी.
-
नाही.. नाही.. हे सिंह नाचत नाहीय ते भांडतायत. हा फोटो क्लिक केला आहे अद्वैत अफाळे या भारतीय तरुणाने
-
नाच्चोओओओओओ (फोटो: मोहोम्मद अलनसीर)
-
चेहरा तर पाहा (फोटो: को ग्रीफ्ट)
-
बर्फामध्ये अन्न शोधण्यासाठी डुबकी मारणारा हा फोटो. हा फोटो काढला आहे अँजला भोल्की यांनी
-
कंटाळलेल्या या अस्वलाचा फोटो काढला आहे एरिक फिशर या फोटोग्राफरने.
-
लाजलेल्या या पेंग्वीनचा फोटो काढला आहे एरिक केलर यांनी.
-
हॅरी वॉकर यांनी काढलेल्या या फोटोला वाचक पसंतीचा पुरस्कार देम्यात आला. अलास्कामध्ये हा फोटो काढण्यात आला आहे.
-
बडबड करणारा आणि ऐकणारा पक्षी. हा फोटो काढला आहे वॅल्डो पिर्सा यांनी
-
काठीशी खेळणारे माकड

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’