-
भारतभरात आजवर देशाच्या स्वातंत्र्यासाठी, समृद्धीसाठी, अखंडतेसाठी, समाजहितासाठी प्राण पणाला लावणाऱ्या तसेच जगाच्या नकाशावर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या थोर राष्ट्रभक्तांना मानवंदना देण्यासाठी अनेक कलाकारांनी आपापल्या कलेचा वापर केला.
थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनातील मुकबधीर शाळेतील दिव्यांग कलाशिक्षक प्रल्हाद ठक यांनी कॅनव्हासवर स्वत:च्या रक्ताने देशातील ज्ञात-अज्ञात सर्व महान राष्ट्रपुरूषांची हुबेहुब चित्र रेखाटून त्यांना अनोखी मानवंदना दिली आहे. स्वराज्य सीमेवर- शिवाजी महारांजाच्या शोर्याची गाथा या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. १९३७ मध्ये हा चित्रपट तिकिटबारीवर आला होता. -
आजवर सव्वाशे राष्ट्रपुरूषांची चित्रे प्रल्हाद ठक यांनी रेखाटली आहेत.
-
त्यासाठी सव्वा लीटर स्व:ताच्या रक्ताचा रंग म्हणून त्यांनी वापर केला आहे.
आजवर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ह्या रक्तचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, मुंबईत असे रक्तचित्र प्रदर्शन पहिल्यांदाच होत आहे. -
ह्या सर्व रक्तचित्रांचे प्रदर्शन मुंबईत प्रथमच भांडुप येथे भरणार आहे.
-
शनिवार दि. १८ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत सदर प्रदर्शनाचा लाभ मुंबईकरांना घेता येईल.
-
प्रदर्शन आणि चित्र विक्रीतून येणारे उत्पन्न पूर्णत: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरून प्रल्हाद ठक हे बाबा आमटेंच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेत आहेत.

तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती