-
चीनने पूर्व लडाखमधील भारतीय प्रदेशात घुसखोरी केल्यानंतर जवळपास चार महिन्यांनी २९-३० ऑगस्टच्या रात्री भारतीय लष्कराने चीनला पहिला मोठा झटका दिला. त्या रात्री भारतीय लष्कराच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सने जे केलं, त्यामुळे दादागिरी करणारा निश्चित चीन बॅकफूटवर गेला आहे.
-
पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्यापासून ते रेझांग ला जवळच्या रेचिन ला पर्यंतच्या सर्व महत्त्वाचे उंचावरील प्रदेश भारतीय सैन्याने आपल्या ताब्यात घेतले. भारतीय सैन्य आता पँगाँग सरोवराच्या अशा भागांमध्ये तैनात आहे, जिथून चीनच्या सैन्य ठिकाणांना सहज लक्ष्य करता येऊ शकते. त्यामुळे भारत आता मजबूत स्थितीमध्ये असून चीन बॅकफूटवर आहे.
-
चीनने आधीच या भागात घुसखोरी केल्यामुळे भारतीय सैन्य पूर्णपणे सर्तक होते. २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्य रिकामे असलेले भूभाग ताब्यात घेण्यासाठी दक्षिणेच्या दिशेने येत असल्याचे दिसताच, भारतीय सैन्याने जलदगतीने हालचाल करत हे मोक्याचे उंचावरील प्रदेश ताब्यात घेतले.
-
भारतीय सैन्याने हे ऑपरेशन जलदगतीने केले असले तरी हा निर्णय तात्काळ केला नाही. त्यासाठी महिनाभर आधीपासून काळजीपूर्वक प्लानिंग करण्यात आले होते. ड्रॉईंग बोर्डवर त्या भागाचे चित्र रेखाटण्यापासून ते फिल्डवर योजना कशी अंमलात आणायची त्याची सर्व तयारी करण्यात आली होती.
-
अशी चाल करण्याआधी राजकीय नेतृत्वाकडून हिरवा कंदिल लागतो. चीन मागे हटण्याबाबत गंभीर नाहीय हे लक्षात आल्यानंतर नवी दिल्लीकडून सैन्याला पुढील कारवाईसाठी परवानगी देण्यात आली.
-
३० जूनला कॉर्प्स कमांडर स्तराची बैठक यशस्वी झाली होती. गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉईंट १४ वरुन चिनी सैन्य मागे हटलं होतं. त्यामुळे चीन आपल्या पूर्वीच्या जागेवर जाईल अशी अपेक्षा निर्माण झाली होती. पण १४ जुलैला चौथ्या फेरीच्या चर्चेमध्ये चीन गोग्रा पोस्ट, हॉट स्प्रिंग आणि पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरुन मागे हटणार नाही हे स्पष्ट झालं.
-
दोन ऑगस्टच्या बैठकीत पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्याजवळ आपण भारतीय हद्दीत घुसून उल्लंघन केलंय हे मान्य करायलाही चीन तयार नव्हता. त्यावेळी रणनितीक दृष्टीने वर्चस्व मिळवण्यासाठी लष्करी पावले उचलण्याशिवाय पर्याय नाही हे भारताच्या लक्षात आले.
-
"सर्व टप्प्यांसाठी योजना तयार असतात. फार कमी लोकांना त्याची माहिती दिली जाते. चर्चा फसल्यानंतर प्लानिंग सुरु होत नाही. सैन्य दल वेगवेगळया योजना तयार करत असते. चर्चेतून काय निष्पन्न होईल हे कधीच सांगता येत नाही. फक्त प्लानची अंमलबजावणी कधी करायची तो प्रश्न असतो" असे लष्करातील एका वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
-
"कृती करण्याच्या १५ दिवस आधी अंतिम योजना तयार झाली. फिल्डवर असणारे कमांडर्स प्रेझेटेशन देण्यासाठी दिल्लीत आले. लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि फिल्ड ऑफिसर्स एकत्र बसले. आपली शक्तीस्थानं आणि चीनचे कमकुवत दुवे यांचा अभ्यास करण्यात आला. रणनितीक अंगाने सर्वात जास्त फायदा कुठे होईल, उदिद्ष्टय कसे साध्य करायचे, त्यावर चर्चा झाली. ऑपरेशन करण्याआधी त्या भागाची टेहळणी करण्यात आली. या सर्व प्लानिंगमध्ये महिना गेला. अत्यंत गोपनीयता ठेवून ही मोहिम आखण्यात आली होती. नशीबही भारताच्या बाजूने होते, फार काही गडबड गोंधळ न होता उद्दिष्टय साध्य झाले" असे सूत्रांनी सांगितले.
-
"दक्षिण किनाऱ्यावरील टेकडया ताब्यात घेण्याचे काम ठराविक एका युनिटकडे देण्यात आले होते. भारताकडे स्पेशल फ्रंटियर फोर्स, इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स आणि भारतीय लष्कर असे तीन पर्याय होते. विशिष्ट उंचावरील प्रदेश ताब्यात घेण्यासाठी ठराविक युनिटसची निवड करण्यात आली होती. अनेक ठिकाणी SFF कमांडोजनी नेतृत्व केले" असे अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधीक छायाचित्र)

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम