-
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी भाषेचा मुद्दा गाजत आहे. अशात आज अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचे शोरूम मुंबईत सुरू झाले आहे. (Photo: Social Media)
-
दरम्यान टेस्लाचे शोरूम मुंबईत सुरू झाल्यानंतर त्याच्या नावाची पाटी मराठी आहे की इंग्रजीत याबाबत अनेकांना उत्सुकता निर्माण झाली आहे. (Photo: Social Media)
-
अशात मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्पेक्समध्ये असलेल्या टेस्ला शोरूमचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo: Soial Media)
-
या व्हायरल फोटोंमध्ये टेस्लाच्या शोरूमच्या नावाची पाटी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असल्याचे दिसत आहे. (Photo: Social Media)
-
शोरूमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला मराठीमध्ये तर उजव्या बाजूला इंग्रजीमध्ये ‘टेस्ला’ असे लिहिलेले दिसत आहे. (Photo: Social Media)
-
टेस्लाने आज शोरूमसह मॉडेल वाय कारही लाँच केल्या आहेत. या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असतील. पहिला प्रकार रियर-व्हील ड्राइव्ह मॉडेल आहे, ज्याची किंमत ६०.१ लाख रुपये आहे आणि दुसरा प्रकार लांब पल्ल्याचा आहे, ज्याची किंमत ६७.८ लाख रुपये आहे. (Photo: ANI)
-
भारतात टेस्ला कारची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपेक्षा खूपच जास्त आहे, ज्याचे थेट कारण भारतात आकारले जाणारे मोठे आयात शुल्क आहे. (Photo: Social Media)
-
अमेरिकेत टेस्ला मॉडेल वायची किंमत ३८.६ लाख रुपये आहे, तर चीनमध्ये त्याच मॉडेलची किंमत ३०.५ लाख रुपये आहे, तर जर्मनीमध्ये ही कार ४६ लाख रुपयांना खरेदी करता येते. (Photo: PTI)
-
भारतात टेस्ला इलेक्ट्रिक कारचे उत्पादन सुरू होईपर्यंत या कार सीबीयू म्हणून विकल्या जातील. पण, एलॉन मस्क यांच्या टेस्लाने आतापर्यंत टेस्ला कारच्या स्थानिक उत्पादनावर मौन बाळगले आहे. (Photo: Social Media)
-
याचबरोबर शोरूमच्या प्रवेशद्वारावर आधी मराठी आणि नंतर इंग्रजी भाषेत ‘टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी लिमिटेड असे’ लिहिले असल्याचे दिसत आहे. (Photo: ANI)