-
व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या आणि २०२५ च्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी भारताच्या लोकशाहीचे कौतुक केले आहे. त्यांनी भारताची लोकशाही इतर देशांसाठी एक उदाहरण असल्याचे म्हटले आहे.
-
मारिया कोरिना मचाडो म्हणाल्या की, जेव्हा देश लोकशाहीकडे वळेत तेव्हा भारत व्हेनेझुएलासाठी “महत्वाचा भागीदार” म्हणून उदयास येऊ शकतो.
-
व्हेनेझुएलामध्ये लोकशाही आणण्यासाठी गेली अनेक वर्षे संघर्ष केल्याबद्दल नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित झालेल्या मचाडो यांनी भारताच्या लोकशाही परंपरा आणि आंतरराष्ट्रीय प्रभावाचे कौतुक केले.
-
“भारत अनेक देशांसाठी जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून एक उदाहरण आहे”, असे त्यांनी टाईम्स नाऊशी संवाद साधताना सांगितले.
-
१९६७ मध्ये जन्मलेल्या मचाडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची आणि “लवकरच त्यांना स्वतंत्र व्हेनेझुएलामध्ये पाहुणे म्हणून बोलवण्याची” आशा व्यक्त केली.
-
मचाडो यांनी नमूद केले की, त्यांच्या मुलीने अलीकडेच भारताला भेट दिली आहे. तिचे अनेक व्हेनेझुएलन मित्र भारतात राहतात.
-
नोबेल पुरस्कार विजेत्या मचाडो यांनी असेही म्हटले आहे की, त्यांचे भारतीय राजकारणावर बारकाईने लक्ष असते. त्यांनी सांगितले की, त्या महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्वाज्ञानापासून प्रेरित आहेत.
-
माचाडो यांनी पुढे नमूद केले की, व्हेनेझुएलाचे समाजवादी सरकार गेल्यानंतर, भारतीय कंपन्या व्हेनेझुएलाच्या ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि दूरसंचार क्षेत्रात मोठी भूमिका बजावू शकतात.
-
आंतरराष्ट्रीय पाठिंब्याची कबुली देत, माचाडो यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्हेनेझुएलाच्या लोकशाही संघर्षात “प्रमुख भागिदार” म्हणून वर्णन केले. (All Photo: @MariaCorinaYA)
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक