-
महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबर ललिता बाबर रविवारी मायदेशी परतली तेव्हा तिचे राज्याच्या क्रीडा व युवक संचालनालयातर्फे तिचे पुणे विमानतळावर थाटामाटात स्वागत करण्यात आले. त्यानंतर तिने सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
-
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांची आज हैदराबादमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली.
-
गच्छिबावली स्टेडियममध्ये बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांचा तेलंगणा सरकारकडून सत्कार करण्यात आला.
-
दीपा कर्माकर आणि तिचे प्रशिक्षक बी.एस.नंदी यांचा त्रिपुराते मुख्यमंत्री मानिक सरकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (छाया – पीटीआय)
-
ऑलिम्पिक स्पर्धेत जिम्नॅस्टिक प्रकारात अंतिम फेरीत धडक मारत इतिहास घडवणारी दीपा कर्माकर शनिवारी सकाळी भारतात परतली. यावेळी आगरतळा विमानतळावर दिपाचे स्वागत करण्यासाठी हजारो क्रीडाप्रेमींची गर्दी जमली होती.
-
दिपा आणि तिचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांच्या स्वागतासाठी राज्यातील क्रीडा पदाधिकारीदेखील जातीने हजर होते.
-
त्रिपुराच्या दीपाने ऑलिम्पिकमध्ये जागतिक स्तरावरील अव्वल जिम्नॅस्टपटूंना टक्कर देत ‘प्रोडय़ुनोव्हा’ हा कठीण प्रकार सादर केला. तिचे पदक अवघ्या काही गुणांनी हुकले होते.
-
पुढील ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू करणार असून भारताला पदक मिळवून देणे माझे लक्ष्य असेल. मी आठवडाभरासाठी माझ्या आई-वडिलांसोबत राहणार असून आईने बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेणार असल्याचे दीपाने सांगितले.
-
दीपा कर्माकरचे स्वागत करण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.
-
लोकांनी केलेल्या जंगी स्वागतानंतर दीपा भारावून गेली होती.

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”