-
क्रीडा दिनाचे औचित्य साधत देशातील ‘क्रीडारत्नां’चा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘खेलरत्न’ आणि ‘अर्जुन’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केलेली बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू, कुस्तीमध्ये कांस्य पदकाची मानकरी साक्षी मलिक, जिम्नॅस्टिक्समध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली दीपा कर्माकर आणि नेमबाज जीतू राय यांना खेलरत्न या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणारी बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू ऑलिम्पिक खेळांमध्ये पदक मिळवणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. (छाया सौजन्य- प्रेम नाथ पांडे) -
कुस्तीपटू साक्षी मलिकने रिओ २०१६ च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये कांस्य पदक पटकावत भारताचे पदकांचे खाते उघडले होते. (छाया सौजन्य- प्रेम नाथ पांडे)
अवघ्या काही गुणांच्या फरकामुळे जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिचे पदक हुकले असले तरीही तिच्या उल्लेखनीय कामगिरीने साऱ्यांचेच लक्ष वेधले. (छाया सौजन्य- प्रेम नाथ पांडे) -
रिओ ऑलिम्पिकमध्ये नेमबाज जीतू रायची कामगिरी निराशाजनक ठरली असली तरीही आतापर्यंतची कारकीर्द पाहता त्यालाही 'खेलरत्न' पुरस्काराने गौरविण्यात आले. (छाया सौजन्य- प्रेम नाथ पांडे)
-
या पुरस्कार वितरण सोहळ्यात एकूण १५ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार बहाल करण्यात आला. यात धावपटू ललिता बाबर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, बॉक्सर शिवा थापा आणि कुस्तीपटू विनेश फोगट यांचा समावेश आहे. (छाया सौजन्य- प्रेम नाथ पांडे)
-
एकूण सहा प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात क्रिकेटपटू विराट कोहली आणि इशांत शर्मा यांना घडविणारे राजकुमार शर्मा, दीपा कर्माकरचे प्रशिक्षक बिश्वेश्वेर नंदी, अॅथलेटिक्स प्रशिक्षक नागापुरी रमेश, बॉक्सिंगचे प्रशिक्षक सागर धायल यांचा समावेश आहे, तर एस.प्रदीप कुमार आणि महावीर फोगट यांना जीवनगौरव पुरस्कार दिला गेला. (छाया सौजन्य- प्रेम नाथ पांडे)
-
कुस्तीपटू साक्षी मलिक भारतात परतल्यापासूनच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (छाया सौजन्य- रेणुका पुरी)
या पुरस्कार सोहळ्यापुर्वी तयारीत व्यस्त असलेल्या भारतीय खेळाडू. साक्षी मलिक आणि विनेश फोगट. (छाया सौजन्य- रेणुका पुरी) -
दरम्यान, दिवंगत महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद सिंग यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. पी. व्ही. सिंधूने महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतिस अभिवादन केले. (छाया सौजन्य- पीटीआय)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक