श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीने शतकी खेळी केली. आपल्या कारकिर्दीतली कोहलीचं हे १७ वं तर श्रीलंकेविरुद्धचं दुसरं शतक ठरलं. कर्णधार म्हणूनही कोहलीचं हे दहावं शतक ठरलं.
कोहली १०३ धावांवर नाबाद राहिला, त्यानंतर भारताने आपला दुसरा डाव घोषित केला. श्रीलंकेसमोर विजयासाठी भारताने ५५० धावांचं आव्हान ठेवलं.
याचदरम्यान कोहलीने अझरला मागे टाकलं. मोहम्मद अझरुद्दीने कसोटीत कर्णधार म्हणून खेळताना ९ शतकं ठोकली आहेत.
कर्णधार म्हणून कसोटीत सर्वाधिक शतकांचा विक्रम सुनिल गावसकर यांच्या नावे आहे. त्यांनी कर्णधार या नात्याने ११ शतकं ठोकली आहेत.