-
माजी कर्णधार सौरव गांगुलीला त्याच्या शेवटच्या कसोटीत महेंद्रसिंह धोनीने शेवटच्या षटकांमध्ये संघाचं नेतृत्व करण्याचा मान दिला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला हा महत्वाचा क्षण होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत भारत विजयाच्या जवळ पोहचला होता. त्यामुळे माजी कर्णधाराची शेवटची कसोटी संस्मरणीय ठरावी याकरता धोनीने कर्णधारपदाची जबाबदारी गांगुलीच्या हाती सोपवली.
-
एखादी स्पर्धा जिंकल्यानंतर धोनीने नेहमी संघातील तरुण खेळाडूंना जिंकलेली ट्रॉफी पकडायचा मान दिला आहे. २०१३ च्या चॅम्पियन्स करंडकात विजय मिळवल्यानंतरही धोनीने जाडेजाला ट्रॉफी उंचवण्याचा बहुमान दिला होता.
-
२००८-०९ च्या काळात भारत मोठ्या कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर पोहचला. यावेळी आयसीसीकडून मानाची गदा स्विकारताना धोनीने, हे यश माझं नसून माझ्या संपूर्ण टीमचं असल्याचं म्हणलं होतं.
-
एखाद्या खेळाडूचा मान आतापर्यंत धोनीने नेहमी राखला आहे. आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामन्यात कोहलीने झुंजार खेळी केली होती. मात्र विजयासाठी अवघ्या काही धावा ह्व्या असताना रैना बाद झाल्यामुळे धोनी मैदानात आला. सर्वोत्तम फिनीशर अशी ओळख असतानाही धोनीने १ धाव काढून विजयी फटका खेळण्याचा मान कोहलीला दिला.
-
२०१३ साली लंका, विंडिज आणि भारत यांच्या तिरंगी मालिकेत धोनी जखमी झाल्याने कोहलीकडे कर्णधारपद आलं. या मालिकेत भारत अंतिम सामन्यात पोहचला, आणि धोनीनेही अंतिम सामन्यात पदार्पण केलं. यावेळी मालिका जिंकल्यानंतर कोहलीच्या मेहनतीची जाण ठेवत, धोनीने मालिकेची ट्रॉफी कोहलीच्या हाती सोपवली होती.

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक