-
सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादची सुरुवात फारशी चांगली झाली नाही, श्रीवत्स गोस्वामी धावबाद होऊन माघारी परतला. मात्र यानंतर कर्णधार केन विल्यमसनने शिखर धवन व अन्य फलंदाजांना सोबत घेऊन आपल्या संघाचा डाव सावरला.
-
मात्र चेन्नईच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने हैदराबादच्या फलंदाजांना बाद करण्याचा सपाटा सुरुच ठेवला. याच कारणामुळे हैदराबादचे फलंदाज मोठी भागीदारी उभारु शकले नाहीत.
-
मधल्या फळीत युसूफ पठाणने फटकेबाजी करत सनराईजर्स हैदराबाद संघाला सामन्यात परत आणलं.
-
युसूफ पठाणचा साथीदार कार्लोस ब्रेथवेटनेही अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला १७८ धावांपर्यंत मजल मारुन दिली.
-
हैदराबादने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात अडखळती झाली. सलामीवीर फाफ डु प्लेसिस संदीप शर्माच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतला.
-
मात्र यानंतर सुरेश रैना-शेन वॉटसन जोडीने चेन्नईचा डाव सावरला. या दोघांमध्येही दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. या भागीदारीमुळे हैदराबादचा संघ सामन्यात बॅकफूटलला ढकलला गेला.
-
शेन वॉटसनने हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत शानदार शतक झळकावलं.
-
सुरेश रैना माघारी परतल्यानंतर शेन वॉटसनने अंबाती रायडूच्या साथीने चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
-
अंबाती रायडूने विजयी फटका खेळल्यानंतर चेन्नईचा संघ मैदानात येऊन एकच जल्लोष करायला लागला.
-
अकराव्या हंगमाच्या विजेतेपदाची ट्रॉफीसोबत जल्लोष करणारा चेन्नईचा संघ. चेन्नईचं आयपीएलमधलं हे तिसरं विजेतेपद ठरलं आहे.

Suryakumar Yadav: सूर्याचा घालीन लोटांगण शॉट! मिस्टर ३६० चा फटका पाहून वैभवने दिली भन्नाट रिॲक्शन, पाहा video