-
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्डचा आज वाढदिवस आहे. ( सर्व फोटो सौजन्य – कायरन पोलार्ड इन्स्टाग्राम)
-
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या पोलार्डचे हजारो फॅन्स आहेत.
-
२०१९ पासून पोलार्डसाठी त्याचा वाढदिवस अजून खास झाला.
-
१२ मे २०१९ ला मुंबई इंडियन्सने चेन्नईला पराभूत अंतिम सामना जिंकला आणि सर्वाधिक चौथ्यांदा IPL विजेतेपद मिळवले.
-
कायरन पोलार्डने त्याच्या धडाकेबाज फलंदाजीने मुंबईला एकहाती सामने जिंकून दिले आहेत.
-
“एक महान फलंदाज, साऱ्या चाहत्यांचा लाडका आणि मुंबई इंडियन्स संघाच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या पोलार्डला वाढदिवसाच्या शुभेच्छा! लवकरच भेटू”, असं ट्विट मुंबई इंडियन्स संघाने केलं आहे.
-
पोलार्ड स्फोटक फलंदाजीबरोबर गोलंदाजीही करतो.
-
कायरन पोलार्ड वेस्ट इंडिजकडून १०० पेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळला आहे. पण एकही कसोटी सामना खेळलेला नाही.
-
वेस्ट इंडिजमध्ये त्रिनिदादमध्ये पोलार्डचा जन्म झाला.
-
कायरन पोलार्डचा जेनाबरोबर २०१२ साली विवाह झाला. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये त्यांचे लग्न झाले.
-
पोलार्डला २०१० साली मुंबई इंडियन्सने पाच कोटी रुपयांना विकत घेतले. तिथून त्याचे आयपीएलमध्ये करिअर सुरु झाले. पोलार्ड पाकिस्तान सुपर लीगमध्येही खेळतो.
-
फोटोमध्ये पोलार्डची पत्नी जेना आहे. पोलार्डचे पत्नीवर जीवपाड प्रेम आहे.
-
अनेक वर्षाच्या प्रेमसंबंधानंतर दोघांनी विवाह केला. पोलार्डच्या आय़ुष्यात जेनाचे स्थान खास आहे.
-
पाकिस्तान सुपर लीगच्या तिसऱ्या मोसमात पोलार्ड मुल्तान सुल्तान संघाकडून खेळला. कुटुंबीयांसोबतचा त्याचा फोटो. क्रिकेटच्या मैदानावर नसताना पोलार्ड कुटुंबामध्ये रमतो.
-
पोलार्डची पत्नी जेनाचा फोटो.

गणराया आजपासून ११ दिवस मेष, वृषभ, सिंहसह ६ राशींना देणार भरपूर पैसा? अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळवणार