-
लॉकडाउन काळात ठप्प झालेल्या क्रीडा स्पर्धांना जर्मनीत शनिवारी सुरुवात झाली. Bundesliga या मानांकित फुटबॉल स्पर्धेला शनिवारपासून सामने सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली. मात्र हे सामने रिकाम्या मैदानावर प्रेक्षकांविना खेळवण्यात आले. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
-
Borussia Dortmund संघाचे खेळाडू सामना सुरु होण्यापूर्वी मैदानात सराव करताना… (फोटो सौजन्य – AP)
-
Dortmund संघाकडून इर्लिंग हालांड या खेळाडूने या सामन्यात पहिला गोल नोंदवला. मात्र सोशल डिस्टन्सिंगचं भान पाळत या खेळाडूंनी काही अशा पद्धतीने सेलिब्रेशन केलं. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
-
प्रत्येक सामन्यात फक्त ५ बदली खेळाडूंना मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांनाही सोशल डिस्टन्सिंग पाळावंच लागणार आहे. (फोटो सौजन्य – AP)
-
Dortmund संघाकडून राफाएल गुरेरोने दुसरा गोल झळकावला. (फोटो सौजन्य – Bundesliga)
-
या गोलनंतर आपल्या सहकाऱ्यांसोबत सेलिब्रेशन करताना राफाएल… (फोटो सौजन्य – Bundesliga)
-
बॉलवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात Dortmund संघाचा इर्लिंग हालांड… (फोटो सौजन्य – राऊटर्स)
-
गोल झळकावल्यानंतर रिकाम्या मैदानासमोर हात पसरवत सेलिब्रेशन करणारा Dortmund संघाचा थॉर्गन हजार्ड (फोटो सौजन्य – AP)
-
या सामन्यात Borussia Dortmund संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवत Schalke संघावर ४-० ने मात केली. (फोटो सौजन्य – AP)

दादरमध्ये झाड कोसळून ‘सलमान खान’ जखमी…