-
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा काल वाढदिवस होता. त्यांनी वयाच्या ५८ व्या वर्षात पदार्पण केले. (सर्व फोटो सौजन्य – रवी शास्त्री इन्स्टाग्राम)
-
वयाच्या १७ व्या वर्षीच मुंबईच्या रणजी संघात निवड झालेले रवी शास्त्री हे मुंबईचे सर्वात तरुण क्रिकेटपटू आहेत.
-
पहिल्याच कसोटी सामन्यात सहा विकेट घेऊन रवी शास्त्रींनी कसोटी क्रिकेटमध्ये संस्मरणीय पदार्पण केले.
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा रवी शास्त्री १० व्या क्रमांकावर फलंदाजीला यायचे पण दोन वर्षात त्यांनी फलंदाज म्हणून आपली गुणवत्ता सिद्ध केली व ते सलामीला येऊ लागले.
-
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या त्यावेळच्या बलाढय संघांविरुद्ध शास्त्री यांनी ३९.६९ च्या सरासरीने सात शतके झळकावली होती.
-
८० कसोटी सामन्यात रवी शास्त्री यांनी ३५.७९ च्या सरासरीने ३८३० धावा केल्या. यात ११ शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश होता. कसोटीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध २०६ ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
-
१५० एकदिवसीय सामन्यात रवी शास्त्री यांनी २९.०४ च्या सरासरीने ३१०८ धावा केल्या. यात चार शतके आणि १८ अर्धशतकांचा समावेश आहे.
-
डावखुरी फिरकी गोलंदाजी करणाऱ्या शास्त्री यांनी कसोटीमध्ये १५१ आणि वनडेमध्ये १२९ विकेट घेतल्या.
-
ऑन अँड ऑफ द फिल्ड रवी शास्त्री हे नाव नेहमी चर्चेत राहिल. करिअर ऐन भरात असताना बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगबरोबर रवी शास्त्रींचे नाव जोडले गेले. पुढे तिने सैफ अली खान बरोबर लग्न केले.
-
रवी शास्त्रींनी १९९० साली रितू सिंह बरोबर लग्न केले. या जोडप्याला एक मुलगी आहे.
-
रवी शास्त्री हे संथगतीचे फलंदाज होते, असे म्हटले जाते. पण त्यांना क्रिकेटची उत्तम जाण आहे. त्यामुळेच युवा क्रिकेटपटूंसाठी त्यांचा सल्ला मोलाचा असतो. सचिनपासून ते विराट कोहलीच्या करिअरमध्ये त्यांनी नेहमीच मोलाचे मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे कोहलीने मुख्य कोचपदासाठी रवी शास्त्रींचा आग्रह धरला होता.
-
१९८९ साली सचिन पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी वकार, अक्रमच्या भेदक माऱ्यासमोर सचिनला पहिल्या डावात फक्त १५ धावा करता आल्या होत्या. बाद होऊन ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतर सचिन निराश झाला होता. हा पहिला आणि शेवटचा सामना ठरेल असे सचिनला वाटले होते. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले होते.
-
ड्रेसिंग रुममध्ये निराश होऊ बसलेल्या सचिनला त्यावेळी रवी शास्त्री यांनी मार्गदर्शन केले होते. "शालेय सामना असल्यासारखी तू फलंदाजी केलीस. तू जगातल्या सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध खेळत होतास. तुला त्यांच्या क्षमतेचा आणि कौशल्याचा आदर करावा लागेल" असा सल्ला शास्त्रींनी त्यावेळी सचिनला दिला होता.
-
"सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांचा सामना करताना असं घडतं. तू काळजी करु नकोस, तू फलंदाजीसाठी क्रीझवर गेल्यानंतर अर्धातास गोलंदाजी खेळून काढं. त्यानंतर तुला त्यांच्या गोलंदाजीबरोबर जुळवून घेता येईल" असा सल्ला त्यावेळी शास्त्रींनी सचिन दिला होता.
-
पुढच्या फैसलाबादमधील सामन्यात शास्त्रींचा तो सल्ला सचिनला उपयोगाला आला आणि पुढे घडलं तो इतिहास आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; ‘ठरलं तर मग’ मालिकेत साकारत होत्या पूर्णा आजीची भूमिका, सिनेविश्वावर शोककळा