-
वन-डे क्रिकेट हा आजही अनेक क्रिकेट प्रेमींचा सर्वात आवडता प्रकार आहे.
-
विशेषकरुन भारताचा सामना असेल तर भारतीय फलंदाज प्रतिस्पर्धी गोलंदाजांची कशी धुलाई करतात हे पाहण्यासाठी अनेक चाहते आजही आपलं काम सोडून टिव्हीसमोर बसलेले असतात.
-
आपल्या आवडत्या फलंदाजांना चौकार-षटकार ठोकताना पाहणं प्रत्येक चाहत्यांना आवडतं.
-
परंतू कधीकधी आपले आवडते फलंदाज वन-डे क्रिकेटमध्ये इतक्या धीम्या गतीने खेळतात की विचारायला सोय नाही…आज आपण १९९५ नंतर सर्वात जास्त चेंडू खर्च करत शतक झळकावलेल्या ३ भारतीय खेळाडूंबद्दल माहिती घेणार आहोत.
-
१) सचिन तेंडुलकर – २००० साली श्रीलंकेविरुद्ध वन-डे सामन्यात सचिनने १४० चेंडू खर्च करत शतक झळकावलं होतं. सचिनच्या कारकिर्दीतलं त्याचं हे सर्वात जास्त चेंडू खर्च करुन झळकावलेलं शतक ओळखलं जातं. यानंतर बांगलादेशविरुद्ध सामन्यातही सचिनने १४७ चेंडू खर्च करत शतक झळकावलं होतं.
-
२) अजय जाडेजा – १९९९ साली आयसीसी विश्वचषकात अजय जाडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३८ चेंडूत शतक झळकावलं होतं. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी कोलमडली होती. त्यामुळे अजय जाडेजाने रॉबिन सिंहच्या साथीने संघाचा डाव सावरत भागीदारी रचली होती.
-
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आज आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे.

तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती