-
सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. पण तो ज्या घरात राहतो ते घर कसं दिसतं हे पाहिलंय का? सध्या सचिन राहत असलेलं घर हे एखाद्या महालापेक्षाही कमी नाही. ( फोटो – फेसबुक, युट्यूब)
-
केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही पाहणार आहोत कसं दिसतं. तर जाणून घेऊया काय आहे त्याच्या या घरात विशेष.
-
सचिनचं हे घर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मधील रुस्तमजी सीजन्स येथे आहे.
-
सचिननं घराच्या खालच्या भागात गणपतीची मूर्तीही तयार करून घेतली आहे.
-
हे घर ३ मजल्यांचे असून सर्व अत्याधुनिक सुविधा या घरात उपलब्ध आहेत.
-
सचिनने हे घर स्वतःच्या आणि आपल्या पत्नी, मुलांच्या गरजेनुसार बनवून घेतलं आहे.
-
सचिनचं हे घर ६ हजार स्क्वेअर फुटमध्ये तयार करण्यात आलं आहे.
-
तसंच या घराची किंमत ४० ते ४५ कोटींच्या जवळपास असल्याचं म्हटलं जातं. ( फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट )
-
घराच्या बाहेर अनोखळी माणसांना रोखण्यासाठी चारही बाजूंनी मोठ्या भिंती उभारण्यात आल्या आहे. तसंच सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत.
-
प्रत्येकाचं आपल्या घराबाबत एक स्वप्न असतं. तसंच माझंही एक स्वप्न होतं. मी त्याबाबत खुप खुश आहे, असं सचिननं सांगितलं होतं. ( फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट )
-
२०११ मध्ये त्यानं आपल्या घराची वास्तूपूजा आणि गृहशांती करून घरात प्रवेश केला होता. ( फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट )
-
बेसमेंटमध्ये सचिनच्या आवडीप्रमाणे इंटिरिअर करण्यात आलं आहे.
-
हे घर बनवायला ४ वर्ष लागली. यासाठी लागणारं बरंचसं साहित्य हे परदेशातून आणलं गेलं. ( फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट )
-
या घराचा पहिला मजला सचिनचा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांच्या पसंतीनुसार तयार करवून घेण्यात आला आहे. या मजल्यावर एक गेस्टरूम सुद्धा आहे. ( फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट )
-
सचिनच्या सर्व गरजा पूर्ण होऊ शकतील अशा पद्धतीने हे घर बनवलं आहे. ( फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट )

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख