-
करोनाच्या तडाख्यानंतर जवळपास चार महिन्यांनी क्रिकेट हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ८ जुलैपासून इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटही सुरू होत आहे. (फोटो सौजन्य – ICC ट्विटर)
-
आंतराराष्ट्रीय क्रिकेट सुरू होण्याआधी काही संघांनी आपल्या खेळाडूंचे दोन गट करून क्रिकेट सामने खेळून पाहिले. त्यात ICC ट्विटर ने करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले. (फोटो सौजन्य – ICC ट्विटर)

अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने खेळाडूंचे दोन संघ करून एक क्रिकेट सामना खेळला. (फोटो सौजन्य – ICC ट्विटर) 
या सामन्यात गडी बाद झाल्यानंतर आनंद साजरा करताना शेक-हँड्स न करता कोपराला कोपर लावून सेलिब्रेशन करण्यात आले. (फोटो सौजन्य – ICC ट्विटर) -
श्रीलंकन क्रिकेट बोर्डानेदेखील आपल्या खेळाडूंचे दोन गट बनवून एक क्रिकेट सामना खेळवला. (फोटो सौजन्य – ICC ट्विटर)

त्या सामन्यात देखील कोपराला कोपर टेकवून खेळाडू सेलिब्रेशन करताना दिसून आले. (फोटो सौजन्य – ICC ट्विटर ट्विटर) 
इंग्लंड क्रिकेट बोर्डानेदेखील आपल्या खेळाडूंमध्ये एक सामना खेळवला. (फोटो सौजन्य – ECB ट्विटर) 
स्टेडियममध्ये विनाप्रेक्षक खेळण्याचा अनुभव कसा असेल याचा खेळाडूंना काही प्रमाणात अंदाज आला. (फोटो सौजन्य – ECB ट्विटर) 
क्रिकेटच्या मैदानाबाहेर असलेल्या एका खांबावर सॅनिटायरही इन्स्टॉल करण्यात आले असून सर्व खेळाडूंनी त्याचा वापर केला. (फोटो सौजन्य – ECB ट्विटर) -
इंग्लंडच्या मैदानावर झालेल्या सामन्यातही कोपराला कोपर टेकवून विकेटचे सेलिब्रेशन केलेले दिसले. (फोटो सौजन्य – ECB ट्विटर)
पुढील वर्षी असं काही होईल…जे कधीच झालं नाही; २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? बाबा वेंगाचं भाकित जाणून धक्का बसेल