-
करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सध्या संपूर्ण जग त्रस्त आहे. अनेक मोठमोठे व्यवसाय डबघाईला आले आहेत. WWE सारख्या मोठ्या कंपनीला देखील करोनामुळे कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. परिणामी या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी WWE ने अनेक लोकप्रिय सुपरस्टार्सला कंपनीतून काढून टाकलं आहे. या फोटो गॅलरीत आपण WWEने काढून टाकलेले सुपरस्टार्स पाहणार आहोत. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
कर्ट अँगल – एक लोकप्रिय रेसलर आहे. त्याने WWE साठी १२ वर्ष रेसलिंग केली आहे. तसेच अमेरिकेसाठी ऑलंम्पिकमध्ये गोल्ड मेडल देखील पटकावलं होतं. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
रुसेव्ह – हा एक रशियन फायटर आहे. गेल्या सात वर्षांपासून तो WWE मध्ये कार्यरत होता. सध्या तो जीम ट्रेनर म्हणून काम करत आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
डार्क मेव्हरीक – हा WWE NXT मध्ये रेसलिंग करायचा. WWE च्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळात डार्क मेव्हरीकच्या फाईट्सला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत नव्हता म्हणून त्याला WWE ने बाहेर काढलं. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
झॅक रायडर – जॅक रायडर आपल्या स्टाईलिश आणि हाय फ्लाय मूव्हसाठी ओळखला जातो. मार्च महिन्यात त्याचा WWE सोबतचा करार संपला त्यानंतर WWE ने त्याचा करार वाढवला नाही. सध्या तो AEW मध्ये रेसलिंग करत आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
कर्ट हॉकिंग्स – कर्टने वर्षभरापूर्वीच WWE सोबत करार केला होता. यापूर्वी तो टीएनए एम्पॅक्टमध्ये रेसलिंग करायचा. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
कर्ल अँडरसन – कर्ल एक अत्यंत आक्रमक फायटर आहे. परंतु WWE मध्ये त्याला कधीच सिंगल सुपरस्टार म्हणून खेळण्याची संधी मिळाली नाही. परिणामी सातत्याने होणाऱ्या अन्यायाला कंटाळून त्याने स्वत:हूनच WWE सोडलं. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
माईक चिओडा – माईक चिओडा एक अनुभवी रेफरी आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ते WWE मध्ये कार्यरत होते. परंतु WWE ने त्यांना देखील बाहेरचा रस्ता दाखवला. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
हिथ स्लेटर – एक स्टाईलिश फायटर आहे. त्याच्या रिंग फाईट्सला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु तरीही WWE ने त्याचा करार वाढवला नाही. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
एरिक यंग – एरिक तीन वर्षांपूर्वी WWE मध्ये आला होता. यापूर्वी तो TNA मध्ये रेसलिंग करायचा. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
एरिक रोवन – एरिक एक आक्रमक फायटर आहे. परंतु WWE मध्ये त्याला जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. सध्या तो AEW मध्ये रेसलिंग करत आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
सारा लोगन – सारा WWE NXT मध्ये रेसलिंग करायची. यापूर्वी तिने WWEमध्ये रेफरीचं देखील काम केलं आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
नो वे जोस – या रेसलरचा WWE सोबतचा करार एप्रिलमध्ये संपला. त्यानंतर WWE ने करार वाढवला नाही. सध्या तो जपान प्रो रेसलिंगमध्ये खेळत आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
माईक केनलिस – एक नामांकित फायटर आहे. आलिकडेच त्याने WWE सोबत करार केला होता. परंतु करारबद्ध असतानाच WWE ने त्याला बाहेर काढलं. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
मारिया केनलिस – मारिया एक लोकप्रिय WWE फिमेल रेसलर आहे. वयाच्या २१ वर्षी तिने WWE मध्ये पदार्पण केलं होतं. आपल्या मादक अदांसाठी प्रसिद्ध असलेस्या मारियाला देखील WWE बाहेर काढलं. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
EC3 – याचं खरं नाव मायकल हटर असं आहे. पूर्वी तो TNA मध्ये रेसलिंग करायचा. त्याची जबरदस्त फायटिंग स्टाईल पाहून त्याला WWE NXT मध्ये संधी मिळाली. परंतु करोनामुळे त्याला WWE ने बाहेर काढलं. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
एडन इंग्लिश – WWE स्मॅकडाउनमध्ये रेसलिंग करायचा. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
लिओ रश – वयाच्या २२ व्या वर्षी लिओने WWE मध्ये पदार्पण केलं होतं. सुरुवातीला तो WWE NXT मध्ये खेळायचा. त्यानंतर त्याला WWE मेन इव्हेंटमध्ये देखील रेसलिंग करण्याची संधी मिळाली होती. परंतु आपली क्षमता दाखवण्याआधीच त्याला WWE ने बाहेर केलं. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
बिली किडमन – हा ९० च्या दशकातील एक सुपरस्टार रेसलर होता. सध्या तो WWE मध्ये बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत होता. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
प्रिमो – प्रिमो WWE मधील एक मिडकार्ड फायटर होता. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
माईक रोटुंडा – हा ९० च्या दशकातील एक सुपरस्टार रेसलर होता. सध्या तो WWE मध्ये बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत होता. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
पॅट बक्स – हा ९० च्या दशकातील एक सुपरस्टार रेसलर होता. सध्या तो WWE मध्ये बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत होता. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
फिट फिनले – हा ९० च्या दशकातील एक सुपरस्टार रेसलर होता. सध्या तो WWE मध्ये बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत होता. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
शॉन दैवारी – एक पर्शियन रेसलर आहे. WWE मध्ये तो स्टोरी रायटर म्हणून काम करत होता. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
स्कॉट आर्मस्ट्रॉन्ग – एक अनुभवी रेफरी आहेत. गेल्या २२ वर्षांपासून ते WWE मध्ये कार्यरत होते. परंतु WWE ने त्यांना देखील बाहेरचा रस्ता दाखवला. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
शेन हेल्म – शेम WWE मध्ये बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून कार्यरत होता. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
लेन्स स्टॉर्म – ८०च्या दशकातील एक सुपरस्टार रेसलर होता. अलिकडेच त्याने रेसलिंगमधून निवृत्ती घेतली. सध्या तो WWE मध्ये क्रिएटिव्ह रायटर म्हणून कार्यरत होता. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग