-
भारतीय कर्णधार विराट कोहली हा सध्या जगभरातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या नावावर क्रिकेटमधील अनेक विक्रमांची नोंद आहे.
-
कोणत्याही गोलंदाजासाठी कोहलीची विकेट घेणं मोठा पराक्रम केल्यासारखे असतं. बांगलादेशची महिला क्रिकेटपटू जहानारा आलमलाही अशीच कामगिरी करत विराटची विकेट काढायची आहे.
-
जहानारा आलम ही बांगलादेश महिला संघासाठी गेले एक दशक खेळते आहे. २०११ मध्ये तिने पदार्पणाचा सामना खेळला होता.
-
वन डे आणि टी२० क्रिकेटमध्ये बांगलादेश महिला संघाकडून जहानाराच्या नावावरच सर्वाधिक बळी आहेत.
-
२७ वर्षीय महिला क्रिकेटपटू जहानारा आलमने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कर्णधार फलंदाज विराट कोहलीला बाद करण्याचं स्वप्न बोलून दाखवलं.
-
"मला संधी मिळाली तर माझी विराट कोहलीला बाद करण्याची इच्छा आहे", असे तिने आनंदबाजारला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
-
याच मुलाखतीत तिने तिचा आवडता IPL संघदेखील सांगितला आहे. आयपीएलमध्ये माझा आवडता संघ कोलकाता नाईट रायडर्स आहे, असं ती म्हणाली आहे.
-
विराट कोहलीला बाद करण्यासोबतच कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळण्याचंही माझं स्वप्न आहे, असंही तिने स्पष्ट केलं.
-
आतापर्यंत मला ईडन गार्डन्सवर खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण एक दिवस मला नक्की खेळण्याची संधी मिळेल अशी मला आशा आहे, असेही ती म्हणाली आहे.
-
यासोबतच लॉर्ड्सच्या मैदानावर खेळण्याचंही माझं स्वप्न आहे. क्रिकेटमधील अनेक मोठे खेळाडू या मैदानावर खेळले आहेत. तेथे मलाही खेळायला आवडेल असं तिने म्हटलं आहे.
-
सर्व फोटो – जहानारा आलम इन्स्टाग्राम

“पण घाई काय आहे?”, सरन्यायाधीश गवई यांची टिप्पणी; मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील १२ आरोपींच्या सुटकेला महाराष्ट्र सरकारचे आव्हान