-
भारतीय संघाचा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासून ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली.
-
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 'टीम इंडिया'त IPLमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान देण्यात आले, पण धक्कादायकरित्या तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माला वगळण्यात आलं.
-
रोहितला वगळण्याच्या या निर्णयानंतर BCCI आणि निवड समितीवर चहुबाजुंनी टीकेची झोड उठली. अनेकांनी यासाठी विराट कोहलीला दोषी ठरवत अंतर्गत राजकारणाचा रंग दिला.
-
रोहित शर्माच्या दुखापतीबाबत रविवारी (१ नोव्हें) BCCIची वैद्यकीय समिती माहिती घेणार असल्याचे सांगण्यात आलं. पण त्याबाबतचा कोणताही अहवाल अद्याप तरी जाहीर करण्यात आलेला नाही.
-
रोहितच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील समावेशावरून होणारा गोंधळ पाहून माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर प्रचंड संतापल्याचे दिसून आले.
-
मुंबईकडून IPL सामना खेळताना रोहित शर्माने आपण दुखापतीतून सावरून पूर्णपणे तंदुरूस्त झाल्याचं सांगितलं.
-
रोहितची दुखापत आणि त्यावर टीम इंडियाच्या फिजिओंचे वक्तव्य अशा विषयांवर टीओआयशी बोलताना वेंगसरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
-
"ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघातून वगळल्यामुळे रोहित स्वत:ही आश्चर्यचकित झाल्यासारखा दिसतोय", असं वेंगसरकर म्हणाले.
-
"BCCIचे फिजिओ यांनी रोहितच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे त्याला दौऱ्यासाठी अनफिट जाहीर केलं. आता प्रश्न हा आहे की मग मुंबई इंडियन्स संघाच्या फिजिओंनी रोहितला खेळण्यासाठी फिट असल्याचं प्रमाणपत्र कसं काय दिलं?"
-
"दोन फिजिओंनी दुखापतीबाबत सादर केलेल्या अहवालात अशाप्रकारची तफावत येतेच कशी?", असा सवालही वेंगसरकर यांनी उपस्थित केला.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा