भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीक सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. एकेकाळी वडिलांच्या स्कूटरवरून क्रिकेट अकॅडमीत जाणाऱ्या विराटकडे आज अनेक अलिशान कार आहेत. विराट कोहलीला ऑडी कंपनीच्या गाड्यांची विशेष आवड आहे. विराट आणि अनुष्का शर्मा या लव्हबर्डकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. कोट्यवधी किंमतीच्या या गाड्याबद्दल जाणून घेऊयात… -
Audi R8 LMX Limited Edition : कोहलीकडे ऑडी R8s दोन महागड्या गाड्या आहेत. त्यापैकी एक मर्यादित एडिशनची आहे. या गाडीची किंमत २ कोटी ९७ लाख रुपये आहे.
दोन कोटी रूपयांची ऑडी कंपनीची R8 V10 ही कार विराटच्या ताफ्यात आहे. या गाडीत 5.2-litre V10 इंजिन आहे. ऑडी A8L W12क्वाट्रो – किंमत एक कोटी ८७ लाख रूपये. ही कार A8 चे लॉन्ग व्हील बेस व्हर्जन आहे. ९५ लाख २५ हजारांची ऑडी S6 ही गाडी विराटच्या ताफ्यात आहे. ऑडी Q7 4.2 TDI: किंमत ८८ लाख -
Audi Q7 45 TDI
जापानी ऑटोमेकर्सनी विराटला टोयाटो फॉर्च्युनर गाडी गिफ्ट म्हणून दिली होती. २०१२ च्या श्रीलंका दौऱ्यात विराट कोहलीला मालिकावीर पुरस्कार प्रदान करण्या आला. मालिकावीर पुरस्कारात विराटला Renault Duster ही गाडी देण्यात आली होती. -
Vogue magazineने अनुष्का शर्माला BMW 7 Series ही गाडी गिफ्ट दिली आहे.
-
Range Rover Vogue: किंमत दोन कोटी रुपये.(Image: Deccan Chronicle)
लग्झरी कार बनवणारी जर्मनीची दिग्गज कंपनी Audi ने १६ जानेवारी २०२० रोजी भारतीय बाजारात आपली फ्लॅगशिप एसयूव्ही-कूप Q8 लाँच केली. ही गाडी खरेदी करणारा पहिला ग्राहक भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ठरला. तब्बल १. ३३ कोटी रुपये इतकी या कारची एक्स-शोरुम किंमत आहे.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा