-
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर म्हणून विराट कोहली ओळखला जातो. त्याचे भारतातच नव्हे तर संपूर्ण देशात चाहते आहेत. विराट हा त्याच्या बॅटिंगमुळेच नव्हे तर लूकमुळे देखील तरुणींमध्ये लोकप्रिय आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी तरुणी आतुर असतात. असेच काहीसे विराटच्या पाकिस्तानमधील चाहतीने केले आहे.
-
पाकिस्तानमधील रिजला रेहान ही विराटची चाहती आहे.
-
२०१८मध्ये रिजला चर्चेत होती.
-
दुबईमध्ये झालेल्या आशिया कप दरम्यान रिजलाचे काही फोटो कॅमेरामध्ये कैद झाले होते आणि ती इंटरनेट सेन्सेशल बनली होती.
-
त्यानंतर २०१९मध्ये ती पुन्हा वर्ल्ड कप दरम्यान चर्चेत आली होती.
-
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीशी संबंधी तिने असे काही वक्तव्य केले होते की सर्वांनाच धक्का बसला होता.
-
एका मुलाखतीमध्ये तिला विचारले की एक अशी कोणती गोष्ट आहे जी पाकिस्तानी क्रिकेट टीमला इंडियाकडून गिफ्ट म्हणून द्यायला आवडेल. त्यावर तिने उत्तर देत 'मला विराट हवा, कृपया विराटला द्या' असे म्हटले होते.
-
वर्ल्ड कप २०१९च्या सेमीफायनलमध्ये रिजलाने टीम इंडियाला पाठिंबा दिला होता.
-
एका मुलाखतीमध्ये बोलताना ती म्हणाली होती की मी तिकिट आधीच बूक केले होते. कारण मला वाटले होते की पाकिस्तान अंतिम सामन्यात जागा मिळवेल.
-
इन्स्टाग्राम अकाऊंटवर रिजलाचे हजारो चाहते आहेत.
-
ती सतत क्रिकेटशी संबंधीत अनेक गोष्टी शेअर करताना दिसते.
-
रिजला ही मूळची पाकिस्तानमधील कराची येथील आहे.
-
पण ती सध्या दुबईमध्ये राहते.

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…