-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर एम.एस.धोनी त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीसाठी ओळखला जातो.
-
क्रिकेटप्रमाणेच धोनीचं गाड्यांवर देखील विशेष प्रेम आहे. धोनीकडे सुपर बाईक्स आणि लक्झरी कारचं कलेक्शन आहे.
-
नुकतंच धोनीच्या कलेक्शनमध्ये ‘लँड रोव्हर-३ एसयूव्ही’ या विंटेज गाडीचा समावेश झालाय. बिग बॉय टॉईजने आयोजित केलेल्या लिलावात धोनीने ही गाडी खरेदी केली आहे.
-
धोनीचं दोन मजल्याचं बाईक आणि कार कलेक्शन गॅरेज आहे. यामध्ये शेकडो बाईक्स आणि लक्झरी कार आहेत.
-
धोनीच्या बाईक आणि कारचं कलेक्शन असणाऱ्या गॅरेजचा हा फोटो आहे.
-
धोनी स्वतः गॅरेजमधील गाड्यांची देखभाल आणि डागडुजी करत असतो.
-
धोनीची सर्वात पहिली बाईक यमाहा राजदूत.
-
धोनीला जपानमध्ये तयार करण्यात आलेल्या बाईक्सचं प्रचंड आकर्षण आहे. २००६ साली लॉन्च झालेली कवासाकी निंजा झेडएक्स १४ आर ही जगातील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या बाइक्सपैकी एक असलेली बाईक धोनीकडे आहे.
-
‘कॉनफेडीरेट एक्स १३२ हेलकॅट’ ही सुमारे ३० लाख किंमत असलेली बाईक धोनीच्या कलेक्शनमध्ये आहे. कॉनफेडीरेट भारतामध्ये बाईक्स विकत नाहीत. त्यामुळेच धोनीने ही गाडी परदेशातून आयात केली.
-
धोनीकडे बाईकप्रेमींचं विशेष प्रेम असणारी हार्ली डेव्हिडसन या कंपनीची ‘हार्ली डेव्हिडसन फॅट बॉय’ ही बाईकसुद्धा आहे. धोनीकडे या बाईकचे टॉप मॉडेल आहे.
-
इटालियन बनावटीची असलेली ‘डुकाटी १०९८ एस’ ही बाईक धोनीच्या ताफ्यात आहे.
-
याशिवाय धोनीकडे रॉयल इनफिल्ड मिचिस्मो, सुझूकी शगून, यमाहा आरडी३५०, यमाहा व्हायझेएफ ६०० आर, बीएसए गोल्डस्टार, हार्डली डेव्हिडसन आर्यन ८८३ सारख्या क्लासिक बाईक्सही आहेत.
-
बाईक्सप्रमाणेच धोनीकडे विंटेज आणि लक्झरी कार देखील आहेत.
-
त्याच्या गॅरेजमध्ये सगळ्यात महागड्या आणि क्लासिक मानल्या जाणाऱ्या मर्सिडीज-बेंझ या कंपनीची ‘मर्सिडीज-बेंझ जीएलई’ ही कार आहे.
-
धोनीकडे ‘ऑडी क्यू ७’ ही लक्झरी कारसुद्धा आहे. या गाडीची किंमत सुमारे ६९ लाख इतकी आहे.
-
याशिवाय धोनीच्या गॅरेजमध्ये जीप ग्रँड चेरोकी ट्रॅकहॉकसारख्या काही अप्रतिम चारचाकी गाड्या देखील आहेत.
-
धोनीकडे असलेल्या या लक्झरी गाडीची किंमत सुमारे १.६ करोड इतकी आहे.
-
धोनीकडे असलेल्या या कलेक्शनमधून त्याचं गाड्यांवर किती प्रेम आहे हे दिसून येतं.

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल