-
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात विराट कोहलीची कामगिरी खालावली आहे. तो आतापर्यंतच्या ९ सामन्यांत फक्त १२८ धावा करु शकला आहे.
-
९ सामन्यांपैकी तो दोन वेळा गोल्डन डकवर शून्यावर बाद झालाय. तर राजस्थान रॉयल्ससोबतच्या सामन्यात सलामीला जाऊनही त्याला फक्त ९ धावा करता आल्या आहेत.
-
कोहली यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्याने खराब फलंदाजी करताना दिसतोय. याच कारणामुळे त्याच्या खेळाविषयी बीसीसीआयनेही चिंता व्यक्त केली आहे.
-
विराट कोहलीच्या खराब खेळाच्या पार्श्वभूमीवर त्याने यापूर्वी आयपीएलमध्ये काय कामगिरी केलेली आहे हे जाणून घेऊया.
-
२०१६ च्या आयपीएलमध्ये विराट कोहलीने धमाकेदार खेळी करुन दाखवली होती. त्याने या हंगामात चार शतके झळकावली होती. विशेष म्हणजे एकाच हंगामात चार शतके झळकावण्याचा विक्रम अजूनही त्याच्याच नावावर आहे. या हंगामात त्याने एका सामन्यात सर्वाधिक ११३ धावा केल्या होत्या. या हंगामात कोहली चार वेळी नाबाद राहिला होता. तर त्याने एकूण ३८ षटकार लगावले होते. या हंगामात बंगळुरु संघाने फायनलपर्यंत मजल मारली होती.
-
२०१७ च्या हंगामात खांद्याला दुखापत झाल्यामुळे तो सुरुवातीच्या चार सामन्यांत खेळू शकला नव्हता. या हंगामात तो एकूण दहा सामन्यात खेळला होता. मात्र यावेळी त्याची फलंदाजी खालावली होती. त्याने या हंगामात एकूण ३०८ धावा केल्या होत्या. यावेळी बंगळुरु संघ प्लेऑफपर्यंतही पोहोचू शकला नव्हता.
-
आयपीएलच्या २०१८ मधील हंगामामध्ये कोहलीने एकूण १४ सामन्यांमध्ये ५३० धावा केल्या होत्या. तर एकूण तीन सामन्यांत तो नाबाद राहिला होता. या हंगामात नाबाद ९२ धावांची त्याने सर्वोत्तम खेळी केली होती. यावेळीदेखील बंगळुरु संघ प्लेऑफपर्यंत पोहोचू शकला नव्हता.
-
२०१९ च्या हंगामात कोहलीने २०१६ नंतर पहिल्यांदाच शतक झळकावले होते. या हंगामात त्याने १४ सामन्यांत ४६४ धावा केल्या होत्या. या हंगामातही बंगळुरु संघाला प्लेऑफपर्यंत जाता आले नव्हते.
-
२०२० च्या आयपीएलमध्ये कोहलीने १५ सामन्यांत एकूण ४६६ धावा केल्या होत्या. या हंगामात त्याने नाबाद ९० धावांची त्याची सर्वोत्तम खेळी होती. तेव्हा बंगळुरु संघ प्लेऑफपर्यंत पोहोचला होता.
-
२०२१ च्या हंगामात कोहलीने १५ सामन्यांमध्ये ४०५ धावा केल्या होत्या. या हंगामात त्याची ७२ धावांची सर्वोत्तम खेळी होती. एकूण १५ सामन्यांमध्ये त्याने तीन वेळा अर्धशतक झळकावले होते. या हंगामात बंगळुरु संघ प्लेऑफर्यंत पोहोचला होता. मात्र त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने पराभूत केले होते.