-    भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर १ जून रोजी लग्नबंधनात अडकला. 
-    त्याने आपली प्रेमिका जया भारद्वाजसोबत लग्नगाठ बांधली आहे. 
-    जया आणि दीपक मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. 
-    जया भारद्वाज ही दीपकची बहीण मालती चहरची मैत्रिण आहे. मालती यांनीच जया आणि दीपक या दोघांची ओळख करुन दिली होती. 
-    यापूर्वी दोघांच्या लग्नपत्रिकेचे फोटो समोर आले होते. तर १ जून रोजी त्यांचे लग्न थाटामाटात पार पडले. 
-    दया भारद्वाज एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये नोकरी करते. जयाने मुंबई विद्यापीठातून पदवी मिळवलेली आहे. 
-    दीपक-जया यांच्या लग्नाला महेंद्रसिंह धोनी येणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र काही कारणास्तव तो या विवाह सोहळ्याल उपस्थित राहू शकला नाही. 
-    या फोटोमध्ये दीपकला त्याचे नातेवाईक हळद लावताना दिसत आहेत. तर दीपक चहरही हसताना दिसतोय. 
-    सध्या दीपक-जया यांच्या लग्नाची चांगलीच चर्चा होत असून त्यांच्या विवाहसोळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 
-    आयपीएलमध्ये दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्ज संघाने १४ कोटी रुपयांना खरेदी केले होते. मात्र दुखापतीमुळे त्याला २०२२ च्या पर्वात भाग घेता आला नाही. (सर्व फोटो इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरुन साभार) 
 
  Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  