-
राजकोट येथे खेळल्या जात असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावून यशस्वी जैस्वालने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
-
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात १२२ चेंडूचा सामना करताना ९ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केले.
-
याआधी जैस्वालने विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावले होते.
-
यशस्वी जैस्वालच्या कसोटी कारकीर्दीतील दुसरे आणि इंग्लंडविरुद्ध सलग दुसरे शतक आहे.
-
यशस्वी जैस्वाल १३३ चेंडूत १०४ धावा काढल्यानंतर पाठदुखीमुळे रिटायर्ड हर्ट झाला.
-
हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत जैस्वालने अनुक्रमे ८० आणि १५ धावा केल्या होत्या.
-
यशस्वी जैस्वाल आतापर्यंत सात कसोटी सामन्याच्या १३ डावात ७५१ धावा केल्या असून यामध्ये एका द्विशतकाचा समावेश आहे. (Photo Source – BCCI X)

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक