-
महेंद्रसिंह धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स यांचे ऋणानुबंध खास असे आहेत. पण सलग १६ हंगाम चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा सांभाळल्यानंतर चेन्नईला आता नवा कर्णधार मिळाला आहे. (Photos: iplt20/Instagram)
-
नव्या हंगामात महेंद्रसिंह धोनीऐवजी मराठमोळा ऋतुराज गायकवाड कर्णधारपदाचा मुकूट सांभाळणार आहे. (Photos: iplt20/Instagram)
-
नव्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर सर्व संघांच्या कर्णधारांच्या फोटोशूटला धोनीऐवजी ऋतुराज आला आणि काही क्षणातच चेन्नईचा नवा नेता कोण हे स्पष्ट झालं. (Photos: iplt20/Instagram)
-
या हंगामात संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणारे काही नवे चेहरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यंदाच्या आयपीएलमधील प्रत्येक संघाचा कप्तान आणि त्याने कोणाची जागा घेतली आहे ते जाणून घेऊया. (Photos: iplt20/Instagram)
-
चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. आजवर महेंद्रसिंग धोनी हा चेन्नईचा कप्तान होता. मात्र यंदा पहिल्यांदाच मराठमोळा ऋतुराज गायकवाड चेन्नईचे नेतृत्व करणार आहे. (Photos: iplt20/Instagram)
-
डिसेंबर २०२२ साली झालेल्या गंभीर कार अपघातानंतर १४ महिन्यांच्या कठोर प्रयत्नांनंतर, ऋषभ पंतला BCCI कडून IPL 2024 मध्ये यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून खेळण्याची परवानगी मिळाली आहे. (Photos: Rishabh Pant/Instagram)
-
मागील आयपीएल हंगामात, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते. मात्र यावेळी त्यांना नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. आयपिळे २०२४मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व ऋषभ पंत सांभाळताना दिसेल. (Photos: iplt20/Instagram)
-
गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व नितीश राणाने केले होते. दुखपतीच्या कारणाने मागील पर्वाट श्रेयस खेळू शकला नव्हता. मात्र यंदा श्रेयस अय्यरकडे पुन्हा एकदा कोलकाताच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. (Photos: iplt20/Instagram)
-
गुजरात टायटन्सचा कप्तान म्हणून हार्दिक पंड्या याची विशेष लोकप्रियता होती. मात्र यंदा हार्दिकने त्याचा जुना संघ मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केले आहे. त्यामुळे या हंगामात शुभमन गील गुजरातचे नेतृत्व करताना दिसणार आहे. (Photos: iplt20/Instagram)
-
केएल राहुल यंदाच्या पर्वातही लखनौ सुपर जायंट्सचा कप्तान असेल. (Photos: iplt20/Instagram)
-
मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा यंदा हार्दिक पंड्या सांभाळताना दिसणार आहे. मात्र अनेक क्रिकेटप्रेमींचे म्हणणे आहे की ते रोहित शर्माला मुंबईचा कप्तान म्हणून मिस करतील. (Photos: iplt20/Instagram)
-
यंदाच्या हंगामात शिखर धवन पंजाब किंग्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. (Photos: iplt20/Instagram)
-
गतवर्षीप्रमाणेच यंदाही राजस्तान रॉयल्सचे कर्णधारपद संजू सॅमसन सांभाळताना दिसणार आहे. (Photos: iplt20/Instagram)
-
२०२२ मध्ये फाफ डु प्लेसिस रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामील झाला असून यंदा तो या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. (Photos: iplt20/Instagram)
-
यंदाच्या हंगामात सनरायजर्स हैदराबादचे नेतृत्व पॅट कमिन्स करणार असून त्याने गेल्या वर्षीचा कप्तान एडन मार्कराम यांची जागा घेतली आहे. (Photos: iplt20/Instagram)

शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्