-
आयपीएल २०२४
आयपीएल २०२४ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात केकेआर संघाचा दिग्गज क्रिकेटपटू सुनील नारायण हा आपला ५०० वा टी-२० क्रिकेट सामना खेळत होता. (फोटो सौजन्य:कोलकाता नाईट रायडर्स) -
५०० वा टी-२० सामना
३५ वर्षे सुनील नारायण ने आपल्या ५०० व्या टी-२० सामन्यामध्ये आरसीबी विरुद्ध खेळताना २२ चेंडूत ४७ धावांची शानदार खेळी केली तर ग्लेन मॅक्सवेल ची महत्त्वाची विकेट ही संघाला मिळवून दिली. (फोटो सौजन्य:कोलकाता नाईट रायडर्स) -
किरॉन पोलार्ड
सर्वाधिक टी-२० सामने खेळण्याचा बाबतीत कारण पोलाड चे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. ज्याने ६६० टी-२० सामने आत्तापर्यंत खेळले आहेत. -
ड्वेन ब्रावो
ड्वेन ब्रावो या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने टी-२० कारकीर्दीत आतापर्यंत ५७३ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या राष्ट्रीय संघाचे आणि टी-२० लीग मधील सामन्यांचा ही समावेश आहे. (फोटो सौजन्य:ड्वेन ब्रावो इन्स्टाग्राम) -
शोएब मलिक
पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. शोएब मलिकने आतापर्यंत ५४२ टी-२० सामने खेळले आहेत. सध्याही तो विविध क्रिकेट लीगमध्ये खेळताना आपल्याला दिसतो. (फोटो सौजन्य:शोएब मलिक सोशल मिडिया) -
सुनील नारायण
या यादीत सुनील नारायण हा चौथ्या क्रमांकावर आहे. ज्याने नुकताच आपला ५०० वा टी-२० सामना खेळला.(फोटो सौजन्य:कोलकाता नाईट रायडर्स) -
आंद्रे रसेल
वेस्टइंडीजचा अजून एक विस्फोटक फलंदाज म्हणजे आंद्रे रसेल याने टी-२० कारकीर्दीत आत्तापर्यंत ४८४ सामने खेळलेले आहेत.(फोटो सौजन्य:कोलकाता नाईट रायडर्स) -
डेव्हिड मिलर
वादळी खेळी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या फलंदाजाने आतापर्यंत टी-२० कारकिर्दित ४७१ सामने खेळले आहेत. सध्या सुरू असलेल्या आयपीएल मध्ये गुजरात टायटन संघाकडून मिलर खेळतो. (फोटो सौजन्य: डेव्हिड मिलर सोशल मिडिया) -
ख्रिस गेल
ख्रिस गेलने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ४६३ टी-२० सामने खेळले आहेत. सध्या तो टी-२० क्रिकेटपासून दूर आहे.(फोटो सौजन्य: ख्रिस गेल सोशल मिडिया)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल