आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणजे सीएसके आणि यंदा २०२४च्या आयपीएल हंगामात ही सीएसके संघामध्ये त्यांचा दिग्गज खेळाडू ‘एमएस धोनी’ने शानदार खेळी केली आहे. यासह त्याने अनेक नवीन विक्रम देखील पूर्ण केले. जाणून घेऊया आयपीएल २०२४ मधील धोनीचा प्रवास. (फोटो/पीटीआय)१४ एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध सीएसकेच्या सामन्यामध्ये खेळताना धोनीने आयपीएलमधील त्याच्या २५० व्या सामना खेळा. या सामन्यासह टी-२० मध्ये एकाच संघासाठी ही कामगिरी करणारा धोनी केवळ दुसरा खेळाडू ठरला. या यादीत पहिल्या स्थानकावर विराट कोहली आहे. (फोटो/पीटीआय)चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स सामन्यामध्ये धोनीने स्टंपच्या मागे एक शानदार झेल घेतला होता. धोनीने हा झेल अवघ्या ०.६ सेकंदात पूर्ण केला होता. (फोटो/पीटीआय)लखनौ विरुद्ध सीएसके सामन्यात धोनीने वेगवान गोलंदाज मोहसीन खानचा सामना केला, त्याने या ओवरमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरमधून चौकार मारला आणि नंतर स्टँडमध्ये १०१-मीटर षटकार देखील झळकवला. (फोटो/पीटीआय)आयपीएल २०२४मध्ये आपल्या शानदार विकेट-कीपिंगमध्ये १५० झेल घेणारा महेंद्रसिंग धोनी पहिला खेळाडू आहे. धोनीने ५ मे ला धर्मशाला येथे पंजाब किंग्जविरुद्ध सामन्यामध्ये आपल्या नावावर हा विक्रम केला. (एक्सप्रेस फोटो/निर्मल हरिंद्रन)आयपीएलमध्ये धोनीची लोकप्रियता ही कोणत्याही खेळाडूंच्या तुलनेत अतुलनीय आहे, देशभरात अनेक चाहते त्याला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी उत्सुक असतात. (एक्सप्रेस फोटो/निर्मल हरिंद्रन)धोनीने २०२४ च्या आयपीएल हंगामात १४ सामन्यात २२०.५५ च्या स्ट्राइक रेटने १६१ धावा केल्या. (एक्स्प्रेस फोटो/पार्थ पॉल)