-
भारताने २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्यानंतर ४ जुलैला भारतीय संघ भारतात दाखल झाला. सकाळी दिल्ली विमानतळावर भारतीय संघाचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
-
२९ जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला होता. तब्बल १७ वर्षांनंतर भारताने टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.
-
यानंतर भारतीय संघाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी दाखल होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी यांनी भारतीय संघाबरोबर जवळपास एक ते दीड तास संवाद साधला.
-
यानंतर भारतीय संघ आता मुंबईत दाखल झाला. जगज्जेत्या भारतीय क्रिकेट संघाचं मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले.
-
टीम इंडियाच्या विस्तारा फ्लाइट ‘UK1845’ ला मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर वॉटर सॅल्यूट देण्यात आला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या विमानाच्या दोन्ही बाजूला उभ्या राहिल्या आणि पाण्याचा फवारा मारला. विमानतळाबाहेरही चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
-
भारतीय संघाला दिल्लीवरून निघण्यास उशीर झाल्याने संघ जवळपास ५.३० च्या सुमारास ते मुंबईत दाखला झाले. त्यानंतर त्यांना कडक सुरक्षाव्यवस्थेत मरिन ड्राइव्ह येथे आणण्यात आले.
-
मात्र, भारतीय संघाला नियोजित वेळेपेक्षा पोहोचण्यास बराच उशीर झाला असला, तरी चाहत्यांची गर्दी वाढतानाच दिसली.
-
भारतीय संघाला मुंबईत दाखल होण्यासाठी उशीर झाल्याने चाहत्यांना थांबून राहावे लागले. या वेळी पावसानेही हजेरी लावली. परंतु चाहत्यांची गर्दी किंवा त्यांचा उत्साह कमी झाला नाही.
-
मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. क्रिकेटच्या चाहत्यांकडून भारतीय संघाच्या अभिनंदनाच्या घोषणा देण्यात आल्या. टीम इंडियाचा मरिन ड्राईव्हवर ते वानखेडे स्टेडिअम रोड शो करण्यात आला.
-
भारतीय क्रिकेट संघाने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक आणि १३ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. विजयाचा हा आनंद साजरा करण्यासाठी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे मैदानापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली.
-
२००७ रोजी भारताने पहिलाच टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतरदेखील मरीन ड्राईव्ह ते वानखेडे अशी मिरवणूक काढली गेली होती.
-
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाचे स्वागत मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात केले होते. रोहित शर्मा त्या संघाचाही भाग होता आणि आजच्या जगज्जेत्या संघाचा तो कर्णधार आहे.
-
जगज्जेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी मुंबईतील गर्दी पाहून भारत आणि महाराष्ट्रातील जनतेचं क्रिकेटवर किती प्रेम आहे? याचा प्रत्यय मुंबईतील गर्दी पाहिल्यानंतर आला. यावेळी मुंबईत उत्साही चाहत्यांची गर्दीच गर्दी दिसत होती.
-
आयसीसी टी२० विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडिअम ते मरीन ड्राईव्हपर्यंत विराट महासागर जमा झाला होता. रोड शोमुळे मुंबईच्या इतर रस्त्यांवरही वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.
-
या विजयी परेडनंतर संघ वानखेडे स्टेडियमवर पोहोचला, तिथे संघाचं जोरदार स्वागत झालं आणि एक कार्यक्रम पार पडला.
-
या विशेष सोहळ्यात भारतीय खेळाडूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि ‘बीसीसीआय’तर्फे संघाला १२५ कोटींचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
-
स्टेडियममध्ये रोहित शर्माने टीम इंडियाच्या खेळाडूंचे वर्ल्डकपमधील भूमिकेबद्दल कौतुक केले. त्याने विजयात हार्दिक पंड्याच्या योगदानाचा उल्लेख केला.
-
“गेल्या १५ वर्षांत मी रोहितला इतका भावूक पाहिलेले नव्हते. आम्ही जेव्हा बार्बाडोस येथील मैदानातील पायऱ्या चढत होतो, तेव्हा आम्हा दोघांना अश्रू अनावर झाले”, असे विराट कोहली वानखेडे येथील आयोजित कार्यक्रमादरम्यान म्हणाला.
-
वयाच्या २१व्या वर्षी याच वानखेडेवर कोहलीने २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जेतेपद मिळवले होते. ‘‘मी आता ३५ वर्षांचा आहे. मी आणि रोहितने जबाबदारी घेऊन पुन्हा एकदा विश्वचषक वानखेडेवर आणला. त्यामुळे मला अधिक आनंद आहे,’’ असे कोहलीने सांगितले.
-
समारंभ संपल्यानंतर संपूर्ण टीम इंडियाने स्टेडियममध्ये फिरून चाहत्यांचे आभार मानले.
-
रोहित शर्मा, विराट कोहलीसह संपूर्ण संघाचा वानखेडेवर डान्स करतानाचा व्हीडिओ खूपच व्हायरल झाला होता.
-
Express photo by Deepak joshi

Throat Cancer: घशाचा कॅन्सर होणार असेल तर दिसतात ही ५ लक्षणं; साधारण वाटणारी पण जीवघेणी, वेळीच ओळखलं तर वाचू शकतो जीव