-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर यांची भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (जय शाह/ट्विटर)
-
गौतम गंभीर २००७ टी-20 विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. अशा परिस्थितीत प्रशिक्षक म्हणून भारतीय क्रिकेट संघासोबत त्याची दुसरी इनिंग सुरू होणार आहे.(इंडियन एक्सप्रेस)
-
इंडियन प्रीमियर लीगमध्ये लखनौ सुपरजायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्ससाठी मेंटरची भूमिका बजावलेल्या गौतम गंभीर यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून किती पगार मिळेल, त्यांचा कार्यकाळ किती असेल आणि त्यांना कोणत्या सुविधा मिळतील? हे जाणून घेऊया. (इंडियन एक्सप्रेस)
-
राहुल द्रविड यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये टीम इंडियाची जबाबदारी स्वीकारली आणि २०२४ टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपला. (गौतम गंभीर/Instagram)
-
राहुल द्रविड यांनी आपली निवृत्ती जाहीर केल्यानंतर बीसीसीआय मुख्य प्रशिक्षकपदाच्या शोधात होती. भारताचे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर या पदासाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी मुलाखतही दिली होती. (जय शाह/ट्विटर)
-
आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गौतम गंभीर यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याचे जाहीर केले आहे. गौतम गंभीर यांचा कार्यकाळ जुलै २०२४ पासून सुरू होत आहे. ते डिसेंबर २०२७ पर्यंत या पदावर राहतील. (इंडियन एक्सप्रेस)
-
गौतम गंभीर पुढील प्रशिक्षक म्हणून टीम इंडियासोबत साडेतीन वर्षे घालवणार आहेत. (इंडियन एक्सप्रेस)
-
या कालावधीत, आयसीसी स्पर्धा, आशिया चषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसह देशांतर्गत आणि परदेशी दौऱ्यांवर संघाच्या यशाची जबाबदारी गौतम गंभीर यांच्यावर असेल. (इंडियन एक्सप्रेस)
-
पगाराबद्दल बोलायचे झाले तर बीसीसीआय टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाला मोठी रक्कम देते. माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना वार्षिक १२ कोटी रुपये मानधन मिळायचे. (गौतम गंभीर/Instagram)
-
अशा परिस्थितीत बीसीसीआय गौतम गंभीर यांना मुख्य प्रशिक्षकपदासाठी वार्षिक १२ कोटी रुपये देऊ शकते, असे मानले जात आहे. (गौतम गंभीर/Instagram)
-
पगारासोबतच बीसीसीआय मुख्य प्रशिक्षकांना अनेक सुविधाही पुरवते. कोणत्याही टूरसाठी मुख्य प्रशिक्षकाला बिझनेस क्लासमध्ये प्रवास करण्याची सुविधा मिळते. (गौतम गंभीर/Instagram)
-
याशिवाय बीसीसीआय परदेश दौऱ्यांवर मुख्य प्रशिक्षकांना रोजचा भत्ताही देते. सन २०१९ मध्ये, ते प्रति दिन २५० डॉलरपर्यंत दुप्पट करण्यात आले. (गौतम गंभीर/Instagram)
India vs Sri Lanka Live Score, Asia Cup 2025: श्रीलंकेचा संघ सुपर ओव्हरमध्ये २ धावांवर ऑलआऊट