-
स्वप्नील कुसाळेने भारतासाठी ५० मीटर थ्री पोझिशन रायफल शुटींगच्या पुरुष गटात कांस्यपदक जिंकले आहे.
-
खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा स्वप्नील महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे.
-
स्वप्नील कुसळे हा कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील कांबळवाडी येथील रहिवासी असून तो शेतकरी कुटुंबातील आहे.
-
स्वप्नीलने २००९ मध्ये शूटिंगला सुरुवात केली.
-
त्याच्या वडिलांनी त्याला महाराष्ट्राच्या प्राथमिक क्रीडा प्रबोधिनीमध्ये दाखल केले आणि वर्षभरानंतर स्वप्नीलने नेमबाजीला आपले करिअर म्हणून निवडले.
-
शूटिंगमध्ये झोकून दिल्यानंतर स्वप्नीलने मागे वळून पाहिले नाही आणि २०१३ मध्येच त्याला लक्ष्य स्पोर्ट्सकडून स्पॉन्सशिप मिळाली.
-
कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे एखाद्या नेमबाजाला नाही, तर भारताचा माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आपला आदर्श मानतो. धोनीच्या मैदानातील शांत आणि संयमी स्वभाव शैलीचा आपल्यावर कमालीचा प्रभाव असल्याचे स्वप्नीलने आपल्या पात्रता फेरीच्या कामगिरीनंतर सांगितले.
-
योगायोग म्हणजे स्वप्नील धोनीप्रमाणे रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून नोकरी करतो. स्वप्नीलच्या विजयानंतर मध्य रेल्वेमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. मध्य रेल्वेचे जीएम रामकरण यादव म्हणाले की, ‘स्वप्नील मध्य रेल्वेच्या पुणे विभागात टीटीई म्हणून कार्यरत आहे, आता त्याची पदोन्नती रेल्वेच्या धोरणानुसार होईल. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्यांना ऑफिसर कॅडर दिले जाते, त्यामुळे त्याला ओएसडी स्पोर्ट्स केले जाईल.’
-
महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करून स्वप्नीलच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. स्वप्नीलच्या या कामगिरीवर अनेक राजकीय नेते तसेच महाराष्ट्र सरकार आनंदी आहे. आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांनी स्वप्नीलला पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
-
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत. तिन्ही पदके नेमबाजीत आली आहेत. स्वप्नीलपूर्वी मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते.
-
त्याचवेळी सरबज्योतसह मनूने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा