-
कसोटी क्रिकेटमधील भारताचा उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीने निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत निवृत्ती घेत असल्याचे म्हटलं.
-
विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील पाच उत्कृष्ट खेळी पाहूया. या विराट खेळींमुळेच कोहली काय करू शकतो याचा प्रत्यत आला.
-
क्रमांक ५ -कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद भूषवत असलेल्या विराट कोहलीने त्याचा कट्ट्रर प्रतिस्पर्धी संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध २०१८ च्या मालिकेत पर्थच्या हिरव्या खेळपट्टीवर १२३ धावांची उत्कृष्ट खेळी केली होती.
-
क्रमांक ४- विराट कोहलीने २०१६ मध्ये इंग्लंडविरूद्ध मुंबईच्या मैदानावर २३५ धावांची खेळी केली होती. विराटने भारतीय संघाचा डाव सावरत ३४० चेंडूत तब्बल २३५ धावांची खेळी केली. ज्यामुळे भारताला २३१ धावांची आघाडी घेण्यात यश मिळालं आणि परिणामी भारताने हा सामना २३१ धावांनी जिंकला.
-
क्रमांक ३ – २०१४ मध्ये कोहलीने ऑस्ट्रेलियाविरूद्ध अॅडलेड कसोटीतील दोन्ही डावात ११५ आणि १४१ धावांची खेळी करत उत्कृष्ट शतकं झळकावली. कर्णधार म्हणून विराटचा हा पहिलाच कसोटी सामना होता.
-
क्रमांक २ – २०१८ मध्ये विराटने इंग्लंडविरूद्ध बर्मिंगहम कसोटीत दोन्ही डावांमध्ये एकट्याने भारताची खेळी पुढे नेली. एका खेळीत त्याने उत्कृष्ट शतक तर एका खेळीत अर्धशतकी खेळी केली होती.
-
क्रमांक १- युवा विराट कोहलीने त्याच्या पहिल्याच कसोटी २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध अॅडलेड कसोटीत शतक झळकावले होते. या संपूर्ण मालिकेत दिग्गज खेळाडूंसह भरलेल्या भारतीय संघाकडून कसोटी शतक झळकावणारा एकमेव खेळाडू होता.
-
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये ३० शतकं झळकावली आहेत. विराटची यामधील १४ शतकं भारताच्या विजयी सामन्यांमध्ये आणि ७ शतकं ही भारताच्या पराभूत झालेल्या सामन्यांमध्ये केलेली आहेत. (वरील सर्व फोटो-एक्सप्रेस संग्रहित फोटो)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल