-
भारताचा उपकर्णधार ऋषभ पंतने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध दोन्ही डावांत शतकं झळकावून इतिहास रचला. इंग्लंडमध्ये कसोटीच्या दोन्ही डावांत शतक करणारा तो तब्बल ९३ वर्षांनंतरचा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. (छायाचित्र – बीसीसीआय ट्विटर)
-
कसोटीच्या दोन्ही डावांत शतक झळकावणारा ऋषभ पंत हा भारताचा सातवा फलंदाज आहे. सुनील गावसकर (३ वेळा) व राहुल द्रविड (२ वेळा) यांनी ही कामगिरी यापूर्वी केली आहे. विजय हजारे हे पहिले भारतीय होते; तर विराट कोहली, अजिंक्य रहाणे व रोहित शर्माही या यादीत सामील आहेत. (छायाचित्र – बीसीसीआय ट्विटर)
-
१९४८ मध्ये विजय हजारे यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही डावात शतक झळकावून इतिहास रचला. त्यानंतर सुनील गावस्कर (३ वेळा), राहुल द्रविड (२ वेळा), आणि विराट कोहली यांनीही ही कामगिरी केली आहे. आता ऋषभ पंतने २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्ध दोन्ही डावात शतक ठोकून या यादीत आपलं नाव सन्मानाने नोंदवलं आहे. (छायाचित्र – बीसीसीआय ट्विटर)
-
२०१४ साली अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीने आपल्या खेळाने सर्वांना भुरळ घातली, दोन्ही डावात शतके झळकावून दमदार कामगिरी केली.
यानंतर २०१५ मध्ये दिल्लीतील कसोटीत अजिंक्य रहाणेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन्ही डावात शतक ठोकत आपल्या दर्जाची छाप सोडली.
२०१९ मध्ये विशाखापट्टणमच्या मैदानात रोहित शर्माने देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन्ही डावात शतके ठोकत आपल्या फलंदाजी कौशल्याने सर्वांची मनं जिंकली. (छायाचित्र – बीसीसीआय ट्विटर) -
ऋषभ पंतने लीड्स कसोटीत पहिल्या डावात १३४ आणि दुसऱ्या डावांत पुन्हा शतक ठोकून इंग्लंडमधील चौथे कसोटी शतक पूर्ण केले.
त्याची इंग्लंडविरुद्धची एकूण कसोटी शतकांची संख्या आता पाच झाली आहे.
या सामन्यात यशस्वी जयस्वाल व शुभमन गिल यांनी पहिल्या डावात, तर के. एल. राहुलने दुसऱ्या डावात शतक झळकावले. (छायाचित्र – बीसीसीआय ट्विटर) -
इंग्लंपहिल्या डावात ऋषभ पंतने १७८ चेंडूंत १३४ धावा करीत १२ चौकार व सहा षटकार लगावले.
दुसऱ्या डावात त्याने शोएब बशीरच्या षटकात आक्रमक खेळी करीत १४० चेंडूंत ११८ धावा फटकावल्या, ज्यात १५ चौकार व तीन षटकारांचा समावेश होता.(छायाचित्र – बीसीसीआय ट्विटर)

मगरीनं बघता बघता १३ वर्षाच्या मुलाला खाऊन टाकलं; गावकरी बघत राहिले अन्…, रडणाऱ्या मुलाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल