-
आयपीएल स्पर्धेला सुरूवात झाल्यानंतर बीसीसीआयचे सोन्याचे दिवस सुरू झाले; या लीगमुळे बोर्डाला प्रचंड आर्थिक फायदा आणि जागतिक ओळख मिळाली. गेल्या आर्थिक वर्षात बीसीसीआयने रेकॉर्डब्रेकिंग कमाई केली आहे. ज्यात आयपीएलचा मोलाचा वाटा आहे. (फोटो- लोकसत्ता)
-
आयपीएल २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्यांदाच जेतेपदाचा मान मिळवला. ही ट्रॉफी जरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने उंचावली असली, तरीदेखील बीसीसीआयचा प्रचंड फायदा झाला आहे.
(फोटो-लोकसत्ता) -
ज्यावेळी या स्पर्धेला सुरूवात झाली, त्यावेळी कोणी विचार केला नव्हता की, ही लीग जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा बनेल. पण बीसीसीआयला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बनवण्यात आयपीएलने मोलाची भूमिका बजावली आहे. (फोटो- लोकसत्ता)
-
बीसीसीआयने गेल्या आर्थिक वर्षात एकूण ९,६४१.७ कोटी रूपये कमाई केली आहे. ही आकडेवारी Rediffusion ने प्रसिद्ध केली आहे. यादरम्यान ५९ टक्के कमाई ही आयपीएल स्पर्धेतून झाल्याचं, या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे. (फोटो- लोकसत्ता)
-
बीसीसीआयने आयपीएलमधून एकूण ५७६१ रूपये कमाई केली आहे.
(फोटो- लोकसत्ता) -
आयपीएल स्पर्धेसह बीसीसीआयने मीडिया राईट्समधून ३६१ कोटी रूपये इतकी कमाई केली आहे.
(फोटो- लोकसत्ता) -
बीसीसीआयकडे ३०,००० कोटी रूपये राखून ठेवले आहेत. यातून बीसीसीआयला दरवर्षी १००० कोटी रूपये व्याज मिळतं. (फोटो-लोकसत्ता)

मोठी दुर्घटना टळली! मुंबई विमानतळावर चाक निखळलेल्या स्पाइसजेटच्या विमानाचं सुरक्षित लँडिंग, Video Viral