-
संपूर्ण देशभरात ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
(फोटो- एक्स) -
कोट्यावधी भारतीयांसह भारतीय खेळाडूंनी देखील स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. दरम्यान आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
(फोटो- एक्स) -
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने देखील भारतीय सैन्याचा फोटो शेअर करत हटके कॅप्शन दिलं आहे.
(फोटो- एक्स) -
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गंभीरने आपल्या एक्स अकाऊंटवर भारतीय संघाच्या जर्सीतील एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टला कॅप्शन देत त्याने, “माझा देश, माझी ओळख, माझं आयुष्य.. जय हिंद” असं लिहिलं आहे. (फोटो- एक्स)
-
भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने तिरंगा हाती असलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने लिहिले की, ” स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा… जय हिंद.”(फोटो- एक्स)
-
भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने देखील तिरंगा हाती असलेला फोटो शेअर केला आहे. (फोटो- एक्स)
-
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने राष्ट्रध्वजाला सलामी देत असतानाचा फोटो शेअर केला आहे. (फोटो- एक्स)

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पहिल्यांदाच EVMची फेरमतमोजणी; तीन वर्षांनंतर फिरला निवडणुकीचा निकाल