-
आशिया चषक २०२५ स्पर्धेला सुरूवात झाली आहे. भारतीय संघाचा पहिला सामना यूएईविरूद्ध होणार आहे. या स्पर्धेत ८ संघ जेतेपदासाठी झुंज देताना दिसून येणार आहेत. (फोटो- एक्स)
-
भारतीय संघाचा सामना १४ सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. यावेळी ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
केवळ भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांना वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये आशिया चषक स्पर्धा जिंकण्यात यश आलं आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
दरम्यान एक असा कर्णधार आहे, ज्याने भारतीय संघाला एकाच स्पर्धेत दोन वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये जेतपदाची ट्रॉफी जिंकून दिली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
हा मान भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने पटकावला आहे. धोनीने भारतीय संघाला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्येही जेतेपद जिंकून दिलं आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
धोनीने २०१० मध्ये वनडे फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आशिया चषकात जेतेपदाचा मान पटकावला होता. त्यानंतर २०१६ मध्ये टी-२० फॉरमॅटमध्ये झालेल्या आशिया चषकात भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

कॅन्सरचा धोका होऊ शकतो कमी! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव