-
Aisa Cup 2025: क्रिकेट या खेळाचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान १४ सप्टेंबर रोजी एका हाय-ऑक्टेन ग्रुप स्टेज लढतीत आमनेसामने येणार आहेत. यंदा राजकीय दबावादरम्यान हा सामना खेळला जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच क्रिकेट सामन्यात आमनेसामने येत असल्याने तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, हार्दिक पंड्यापासून शाहीन आफ्रिदीपर्यंत दोन्ही देशाच्या अशा खेळाडूंबद्दल जाणून घेऊ ज्यांची कामगिरी खेळाचा प्रवाह कधीही बदलून टाकू शकतात. (Photo Source: AFP)
-
हार्दिक पंड्या:
पाकिस्तान हा हार्दिक पांड्याचा आवडता प्रतिस्पर्धी आहे. त्याने गेल्या सहा टी-२० सामन्यांमध्ये फक्त १२ च्या सरासरीने १३ बळी घेतले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफनेही पांड्याचे कौतुक केले आणि म्हटले की हा खेळाडू कोणत्याही क्षणी खेळ पूर्णपणे बदलू शकतो. लतीफने पांड्याचे वर्णन भारताचा ‘एक्स-फॅक्टर’ म्हणून केले आहे. (Photo Source: AFP) -
शाहीन आफ्रिदी:
डावखुरा वेगवान गोलंदाज हा भारतासाठी तितकाच मोठा धोका आहे जितका हार्दिक पंड्या पाकिस्तानसाठी आहे. पुन्हा एकदा, दुबईमध्ये चेंडू स्विंग करण्याची क्षमता दाखविणाऱ्या डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीनवर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल (ज्यांनी त्याच्यासोबत काही छान लढाया अनुभवल्या आहेत) यांचं लक्ष असणार आहे. (Photo Source: AFP) -
कुलदीप यादव:
भारताचा फिरकी गोलंदाज पाकिस्तानी फलंदाजीसाठी कदाचित सर्वात मोठा धोका आहे. २०२५ चा बहुतांश काळ बेंचवर घालवल्यानंतरही, कुलदीपने यूएई सामन्यात सर्वात प्रभावी स्पेल गोलंदाजी केली, जिथे त्याने चार विकेट घेतल्या आणि तो काय करू शकतो हे दाखवून दिले. (Photo Source: AFP) -
मोहम्मद नवाज:
आशिया कपच्या तयारीत हसन नवाजवर बरेच लक्ष होते; तथापि, पाकिस्तानचा सर्वात आशादायक अष्टपैलू खेळाडूंपैकी एक, मोहम्मद, तितक्याच उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अफगाणिस्तानविरुद्ध हॅटट्रिक घेतल्यानंतर, नवाजने ओमानविरुद्ध फलंदाजीने आपली क्षमता दाखवून दिली. भारताला या जबरदस्त फलंदाजावर लक्ष ठेवावे लागेल. (Photo Source: AFP) -
जसप्रीत बुमराह:
भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आणि मोठ्या सामन्यांमध्ये भारतीय संघाचे सर्वात मोठे शस्त्र, बुमराहचा पाकिस्तानविरुद्धचा विक्रम अद्भुत आहे. चार सामन्यांमध्ये पाच बळी घेत, बुमराहचा इकॉनॉमी रेट ५.४३ आहे. नवीन चेंडू आणि डेथ ओव्हर्समध्ये भारताच्या सर्वात विश्वासार्ह वेगवान पर्यायांपैकी एक, बुमराह स्वतःला एक भक्कम प्रतिस्पर्धी म्हणून सादर करेल अशीच अपेक्षा आहे. (Photo Source: AFP) -
सैम अयुब:
हा तरुण डावखुरा फलंदाज पाकिस्तानचा सर्वात रोमांचक युवा सलामीवीर आहे. तो अजूनही त्याचा खेळ सुधारत आहे. तो विरोधी संघातील काही मोजक्या फलंदाजांपैकी एक असू शकतो जो भारतीय आक्रमणाला विविध प्रकारे खेळून प्रत्त्युत्तर देऊ शकतो. (Photo Source: AFP) -
शुभमन गिल:
उपकर्णधार शुभमन गिल हा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांसह उच्च-दबाव असलेल्या सामन्यांमध्ये भारताच्या फलंदाजीचा आधारस्तंभ राहिला आहे. त्याच्या शांत स्वभावासाठी आणि सुंदर स्ट्रोकप्लेसाठी ओळखल्या जाणाऱ्या गिलने आशिया कप स्पर्धांमध्ये काही संस्मरणीय डाव रचले आहेत. स्ट्राईक फिरवत डावावर नियंत्रण ठेवण्याची त्याची क्षमता दुबईमध्ये काही जलद धावा जमवण्याच्या भारताच्या क्षमतेसाठी महत्त्वाची ठरेल. (Photo Source: AFP) -
फखर झमान:
त्याच्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जाणारा, पाकिस्तानचा अनुभवी सलामीवीर या सामन्याची दिशा बदलू शकतो. या वर्षी त्याच्या फॉर्ममध्ये चढउतार राहिला आहे. झमान हा विशेषतः भारताविरुद्ध, सतत धोकादायक राहू शकतो. दुबई थ्रिलरमध्ये त्याची पॉवर-हिटिंग आणि गॅप शोधण्याची क्षमता यावर भारताला प्लॅन करुन खेळावे लागेल. (Photo Source: AFP)

“सलमान खान रोज रात्री ऐश्वर्याला…”, अभिनेत्रीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं; म्हणाली, “खूप जास्त…”