-
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शून्यावर बाद होऊन माघारी परतला. दरम्यान शून्यावर बाद होण्याची ही त्याची पहिलीच वेळ नाही. कोण आहेत सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होणारे भारतीय फलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होणारा भारतीय फलंदाज आहे. विराट ३९ वेळेस शून्यावर बाद झाला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्मा ३४ वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत तिसऱ्या स्थानी असलेला सचिन तेंडुलकर देखील ३४ वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा स्फोटक सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३० वेळा शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली २९ वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतले आहेत (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका