-
भारताच्या महिला संघाने वनडे वर्ल्डकप २०२५ दरम्यान दिवाळीचं खास सेलिब्रेशन केलं आहे.
-
भारताच्या वनडे संघातील सर्व महिला खेळाडू या सेलिब्रेशनसाठी उपस्थित होत्या.
-
भारताच्या लेकींनी एकमेकांबरोबर छान छान फोटो काढत दिवाळी सणाचं खास सेलिब्रेशन केलं.
-
इतकंच नव्हे तर फटाके फोडतानाही दिसल्या.
-
रेणुका सिंग ठाकूर फुलबाजी नाही तर आगपेटीच्या काडीने पाऊस लावताना दिसली.
-
तर जेमिमा रोड्रीग्ज भुईचक्र लावताना दिसली. याशिवाय काहींनी फटाक्याबरोबर छान फोटोही काढलेत.
-
हरमनप्रीत कौर आणि हरलीन देओल आकाशातील फटाके पाहताना दिसत आहेत.
-
भारताच्या महिला संघाच्या दिवाळी सेलिब्रेशनमधील फोटोने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
-
वनडे वर्ल्डकप २०२५ आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. सेमीफायनलसाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे संघ पात्र ठरले आहेत. आता चौथ्या संघासाठी रस्सीखेच सपरू आहे.
-
वनडे वर्ल्डकप २०२५ सेमीफायनलच्या चौथ्या जागेसाठी भारत, न्यूझीलंड आणि श्रीलंकेचे संघ शर्यतीत आहेत.
-
न्यूझीलंडविरूदद्धचा सामना भारतीय संघासाठी करो या मरो असणार आहे.
-
भारतीय संघाला सेमीफायनल गाठण्यासाठी न्यूझीलंड संघाला पराभूत करणं आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – BCCI Women -X Video)

हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका