-
गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी ICC महिला विश्वचषक २०२५ जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
-
या विशेष प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संघातील सर्व सदस्यांचे ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केले आणि म्हणाल्या की, “तुम्ही इतिहास रचला आहे.” या भेटीच्या छायाचित्रांचा आणि व्हिडीओंचा सोशल मीडियावर वेगाने प्रसार होत आहे.
-
राष्ट्रपतींनी संघाच्या यशाचे कौतुक करताना म्हटले, “या संघाने वर्ल्ड कप जिंकून केवळ देशाचा सन्मान वाढवला नाही, तर नव्या पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.”
-
त्या पुढे म्हणाल्या, “ही टीम म्हणजे भारताचे प्रतिबिंब आहे. विविध राज्यांतील, विविध सामाजिक पार्श्वभूमीतील या खेळाडू एकत्र येऊन एकजुटीचे उदाहरण सादर करत आहेत.”
-
राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले की, या विजयामुळे देशवासियांचा आपल्या खेळाडूंवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
-
त्यांनी हेही म्हटले की, आता ही टीम त्या सर्व मुलींसाठी आदर्श बनली आहे, ज्या क्रिकेटमध्ये आपले करिअर घडवू इच्छितात.
-
या प्रसंगी संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना संपूर्ण संघाने स्वाक्षरी केलेली जर्सी भेट दिली. त्या म्हणाल्या, “ही स्पर्धा आमच्यासाठी अत्यंत खास होती. जेव्हा आम्हाला कळलं की हा वर्ल्ड कप भारतात होत आहे, तेव्हा आम्ही ठरवलं होतं की ट्रॉफी देशाबाहेर जाणार नाही. आमच्या प्रयत्नांना यश आलं आणि हा आनंद आपणासमोर शेअर करताना आम्ही अभिमान बाळगतो.”
-
संपूर्ण संघ आणि राष्ट्रपती मुर्मू यांनी एकत्र छायाचित्र सत्रात भाग घेतला. ही भेट फक्त भारतीय महिला क्रिकेटच्या ऐतिहासिक यशाचा उत्सव नव्हती, तर देशातील महिला क्रिकेटची वाढती लोकप्रियता आणि तरुण पिढीसाठी प्रेरणेचं प्रतीक ठरली.
-
(सर्व फोटो सौजन्य : PTI)
पार्थ पवारांच्या कंपनीचं गौडबंगाल ! चार वर्षांत कमावलेलं उत्पन्न अखेर आलं समोर