-
पुण्यातून उमगलेला खेळ १९व्या शतकाच्या मध्यात ब्रिटिश अधिकारी भारतातील पुण्यात तैनात होते. तेथे त्यांनी व्यायाम आणि मनोरंजनासाठी एक खेळ खेळायला सुरुवात केली, ज्याला त्यांनी त्या शहराच्या नावावरून ‘पूना’ असे नाव दिले. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
भारताचा खेळ, परंतु श्रेय दुसऱ्यांना भारतात अनेक खेळांची निर्मिती झाली, पण दुर्दैवाने त्याचे श्रेय इतर देशांना मिळाले. ‘बॅडमिंटन’ हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे, ज्याची खरी सुरुवात भारतातील पुण्यात झाली होती. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
खडकीतील पहिला खेळ सन १८६७ मध्ये पुण्याच्या खडकी भागात, आज जिथे ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे, तिथे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या बंगल्याच्या मागच्या अंगणात पहिल्यांदा हा खेळ खेळला. लाकडी रॅकेट आणि पंखांच्या शटलने खेळला जाणारा हा खेळ लवकरच लोकप्रिय झाला. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
‘पुना’पासून ‘बॅडमिंटन’पर्यंतचा प्रवास ब्रिटिश अधिकारी भारतातून इंग्लंडला परतताना हा खेळ सोबत घेऊन गेले. १८७३ मध्ये ‘ड्यूक ऑफ ब्यूफोर्ट’ यांनी आपल्या ‘बॅडमिंटन हाऊस’मध्ये हा खेळ पाहुण्यांसमोर सादर केला आणि याच ठिकाणावरून या खेळाचे नाव ‘बॅडमिंटन’ पडले. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
भारताचे नाव हरवले, श्रेय इंग्लंडला ‘पूना’ म्हणून ओळखला जाणारा हा भारतीय खेळ इंग्लंडमध्ये ‘बॅडमिंटन’ म्हणून प्रसिद्ध झाला आणि हळूहळू या खेळाच्या उगमस्थानाचे नाव इतिहासातून नाहीसे झाले. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
दक्षिण भारतातील ‘बॉल बॅडमिंटन’ ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ‘पूना’ खेळायला सुरुवात करण्यापूर्वीच दक्षिण भारतात ‘बॉल बॅडमिंटन’ नावाचा समान खेळ खेळला जात होता. याची सुरुवात १८५६ मध्ये तंजावूरच्या राजघराण्याने केली होती. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
लोकरच्या चेंडूसह खेळला जाणारा खेळ या खेळात शटलऐवजी हलक्या लोकरच्या चेंडूचा वापर केला जात असे. हा खेळ लवकरच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि हैदराबादमध्येही लोकप्रिय झाला आणि १९७० च्या दशकापर्यंत ‘शटल बॅडमिंटन’पेक्षा अधिक प्रसिद्ध होता. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
प्रकाश पादुकोणमुळे बदलले चित्र १९८० मध्ये प्रकाश पादुकोण यांनी ‘ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप’ जिंकली आणि भारतात ‘शटल बॅडमिंटन’ला खरी ओळख मिळाली. या विजयानंतर संपूर्ण देशभर हा खेळ घराघरांत पोहोचला. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
आजचा बॅडमिंटन आणि भारताचा अभिमान आज बॅडमिंटन हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत आणि पुल्लेला गोपीचंद यांनी जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
कतरिना कैफ ४२ व्या वर्षी झाली आई, विकी कौशलने दिली गुड न्यूज, माधुरी दीक्षित कमेंट करत म्हणाली…