-
दिवसोंदिवस वाढत असणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे भितीचे वातवरण आहे. त्यामुळेच आता गुगलने जवळच्या करोना चाचणीचे केंद्र झपटप शोधून देणारा एक नवा पर्याय गुगल सर्चवर उपलब्ध करुन दिला आहे. अगदी काही क्लिकमध्ये युझर्सला त्यांच्या घराजवळच्या करोना चाचणी केंद्राची माहिती यामुळे मिळणार आहे. चला तर मग पाहुयात गुगलच्या मदतीने कशापद्धतीने जवळचं करोना चाचणी केंद्र शोधण्याच्या सोप्या स्टेप्स. आणि करोनाची चाचणी करण्यासाठी काय आवश्यक आहे यासंदर्भातील माहिती…
-
फोनमध्ये गुगल ब्राउझर ओपन करुन ‘Coronavirus Testing’ किंवा ‘COVID Testing’ या टर्म सर्च करा.
-
ही सेवा मराठी, इंग्रजी, हिंदीबरोबरच सात भारतीय प्रदेशिक भाषांमध्ये आहे. यात मराठीबरोबरच बंगाली, तेलगू, तमीळ, मल्याळम, कन्नड आणि गुजराती भाषेचा समावेश आहे.
-
या केंद्रांना भेट देण्याआधी भारत सरकराने सुरु केलेल्या 1075 या हेल्प लाइन क्रमांकावर कॉल करा.
-
तसेच करोनाची चाचणी करण्यासाठी डॉक्टरचे प्रिस्क्रीप्शन अत्यावश्यक आहे. त्यामुळे ते असेल तरच करोना चाचणी केली जाते हे लक्षात ठेवा. (प्रातिनिधिक फोटो)
-
हा सर्च रिझल्ट दाखवताना तुम्हाला टेस्टींग नावाचा एक टॅब दिसेल. यामध्ये तुमच्या जवळच्या करोना चाचणी केंद्रांची माहिती आणि इतर महत्वाच्या टीप्स दिलेल्या असतील.
-
“जवळचे अधिकृत कोविड १९ चाचणी केंद्र शोधण्याची सर्वात सोपी पद्धत पुढीलप्रमाणे. शोधा इंग्रजी, हिंदी आणि सात प्रादेशिक भाषांमध्ये. फक्त गुगल करा,” अशा कॅफ्शनसहीत @PIBMumbai या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही यासंदर्भात माहिती देण्यात आली होती.
-
हा फोटो @PIBMumbai या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला होता.
-
करोनासंदर्भात जनसामान्यांमध्ये भीती असल्याने वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना मदत करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था तसेच आय़टी क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्या वेगवगेळ्या फिचर्सच्या माध्यमातून पुढाकार घेताना दिसत आहे. (प्रातिनिधिक फोटो)
-
गुगलच्या या नवीन फिचरचा नक्कीच सर्वसामान्यांना फायदा होईल. (प्रातिनिधिक फोटो)
Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज