-
आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या डेस्कटाॅप किंवा लॅपटाॅपवरच्या चित्रात दाखवलेल्या कीज् नक्की काय करतात असं विचारलं तर सांगता येईल ?यापेैकी प्रत्येक ‘की’ चं काम काय हे गूगल न करता चटकन् सांगता येईल?
-
या कीज् ना फंक्शन कीज् म्हणतात. शाळेत असताना काँम्प्युटरच्या पुस्तकात वाचलेलं किंवा MS-CIT मधलं वाक्य आठवलं?
-
‘या फंक्शन कीज् पैकी प्रत्येक ‘की’ चं स्वत:चं एक काम असतं’ माहीत नाही नक्की काय ते? मग पुढे वाचत जा…
-
F1 Key : एखादा प्रोग्रॅम किंवा साॅफ्टवेअर वापरण जमत नसेल तर ‘help’मध्ये जावं लागतं. help चं बटण मिळत नसेल तर F1 दाबावं. help मेनू ओपन होतो.
-
F2 Key : एखाद्या फाईल किंवा फोल्डरचं नाव बदलायचं असेल तर F2 दाबून हे काम झटक्यात करता येतं
-
F3 Key : एखाद्या साॅफ्टवेअर किंवा अॅप्लिकेशनमध्ये एखादी गोष्ट सर्च करायची असेल तर F3 दाबून हे करता येतं.
-
F4 Key : तुमच्या डेस्कटाॅप किंवा लॅपटाॅपवरती अॅक्टिव्ह विंडो जर बंद करायची असेल तर Alt+F4 दाबून हे काम करता येतं.
-
F5 Key : ही फंक्शन की काय करते हे बऱ्याच जणांना माहीत असतं. रिफ्रेश किंवा रिलोड करण्यासाठी F5 की चा वापर होतो.
-
F6 Key : इंटरनेट ब्राऊझर सुरू असताना ही ‘की’ दाबल्यावर कर्सर थेट ‘अॅड्रेस बार’ मध्ये जातो. बहुतांशी सगळ्या इंटरनेट ब्राऊझर्समध्ये हे लागू होतं.
-
F7 Key : मायक्रोसाॅफ्ट वर्ड सारख्या अॅप्लिकेशनमध्ये स्पेल चेक आणि ग्रामर चेक करायला या ‘की’चा वापर करता येतो.
-
F8 Key : विंडोज् मधला बूट मेनू अॅक्सेस करण्यासाठी F8 च्या वापर होतो.
-
F9 Key : मायक्रोसाॅफ्ट वर्डमध्ये पेज रिफ्रेश करायला किंवा मायक्रोसाॅफ्ट आऊटलूकमध्ये मेल पाठवायला किंवा स्वीकारायला ही की वापरतात.
-
F10 Key : राईट क्लिक करण्याएेवजी shift आणि F10 की दाबीनही हे काम आपण करू शकतो.
-
F11 Key : इंटरनेट ब्राऊझरमध्ये फुलस्क्रीन करण्यासाठी किंवा फुलस्क्रीनमधून बाहेर पडायला ही ‘की’ वापरली जाते.
-
F12 Key : मायक्रोसाॅफ्ट वर्डमध्ये ‘सेव्ह अॅज्..’ मेन्यू ओपन होतो.

नागपुरात दंगल नेमकी कशामुळे भडकली ? असा आहे घटनाक्रम