-
इंस्टाग्रामचं Reel फीचर काहीच वेळात प्रचंड गाजलं आहे.
-
फोटोच्या तुलनेत रील व्हायरल होण्याचे प्रमाण अधिक असल्याने अनेकजण साध्या फोटोलाही गाणी जोडून इफेक्ट लावून रील म्हणून पोस्ट करतात.
-
इंस्टाग्राम रीलवरून आता आपल्याला दिवाळी बोनस मिळवण्याची मोठी संधी आहे
-
रील बनवणाऱ्या क्रिएटर्ससाठी इंस्टाग्रामने दिवाळीच्या निमित्ताने Reel Play Bonus अशी कमाल योजना सुरु केली आहे.
-
इंस्टाग्राम रीलच्या माध्यमातून आपण ५००० डॉलर म्हणजे तब्बल ४ लाख रुपयांपर्यंत बोनस कमावू शकता.
-
सुरुवातीला इंस्टाग्रामने ही योजना केवळ अमेरिकेत लाँच केली होती मात्र आता भारतातही ही स्कीम सुरु करण्यात आली आहे.
-
Reel Play Bonus अंतर्गत ठराविक वेळेत सर्वाधिक व्हायरल होणाऱ्या रीलला परफॉर्मन्स बघून हा बोनस दिला जाईल.
-
इंस्टाग्रामच्या माहितीनुसार, रीलच्या व्ह्यूजवरून बोनस विजेता ठरणार आहे, यासाठी ३० दिवसात किमान १००० व्ह्यूज असणे आवश्यक आहे.
-
आपले इंस्टाग्राम अकाउंट प्रोफेशनल किंवा क्रिएटर अकाउंट असणे आवश्यक आहे, प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये आपल्याला बोनस नोटिफिकेशन प्राप्त होईल.
-
सर्वाधिक बोनस मिळवण्यासाठी आपल्याला ९.८ मिलियन व्ह्यूज असणे आवश्यक आहे
-
बोनसची रक्कम ही व्ह्यूज व एकूण परफॉर्मन्सवरून बदलू शकते. या फीचरचा फायदा घेण्यासाठी ११ नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे.

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी