-
भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला २ क्रंमांकाचा देश आहे. या मोठ्या देशाला ४ टेलिकॉम कंपन्या त्यांची सेवा पुरवितात. (संग्रहित फोटो)
-
यापैकी बीएसएनएल ही ऑपरेटिंग कंपनी सोडता जिओ, एअरटेल आणि व्हिआय म्हणजेच व्होडाफोन -आयडिया या ३ खाजगी कंपन्या आहेत. (संग्रहित फोटो)
-
बीएसएनएल म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड ही सरकारची संस्था आहे. (संग्रहित फोटो)
-
साहजिकच आहे की भारतात कोणत्या कंपनीचे सिम सर्वाधिक प्रमाणात वापरले जाते हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल. (संग्रहित फोटो)
-
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) सर्व ग्राहकांच्या विवरणाचा डेटा जारी करते. (संग्रहित फोटो)
-
प्रतिमहा जारी केल्या जाणाऱ्या डेटामध्ये बरेच चित्र स्पष्ट होते. अलीकडेच जुलै महिन्याचा अहवाल समोर आला आहे. (संग्रहित फोटो)
-
या अहवालानुसार जिओ ही देशातली सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर ठरली आहे. जुलैअखेरीस जिओकडे ४७. ७५ कोटी ग्राहक आहेत, अशी माहिती हा अहवाल देतो. त्यामुळे जिओ सर्वाधिक वापरले जाणारे सिम आहे. (संग्रहित फोटो)
-
एकट्या जुलै महिन्यात कंपनीने ४. ८२ लाख नवे ग्राहक जोडले आहेत. (संग्रहित फोटो)
-
दुसऱ्या क्रमांकावर आहे एअरटेल. जुलैच्या अहवालात एअरटेलकडे ३९.१४ कोटी ग्राहक असल्याचे स्पष्ट झाले आहे. (संग्रहित फोटो)

‘हे’ झाड तारक की मारक ? इतर राज्यात बंदी, महाराष्ट्रात मात्र धडाक्यात…